छत्रपती शिवरायांबद्दल बोलताना काळजी घ्यावी..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलताना काळजी घेऊन बोललं पाहिजे. कुठे कोणाची बोलण्यात चूक झाली असेल त्यांनी ती चूक सुधारायला हवी. गरज पडल्यास माफी ही मागितली पाहिजे अस मत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी व्यक्त केले आहे. ते लोणावळ्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. किरीट सोमय्या यांनी अप्रत्येक्षपणे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि आमदार प्रसाद लाड यांच्यावर भाष्य केले आहे. दोघांनी नुकतंच छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत.
किरीट सोमय्या म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज देशासाठी पूजनिय, आदरणीय, हिंदू धर्माच रक्षण करणारे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल संबंध हिंदुस्थानला अभिमान आहे. आम्ही सर्व जण प्रेरणा घेतो. प्रत्येक जण त्यांच्या कार्याच कौतुक करतो. प्रत्येक माणूस आदराने प्रेमाने पाहतो. पुढे ते म्हणाले की, कुठे कोणाची बोलण्यात चूक झाली असेल तर त्यांनी काळजी घेतली पाहिजे. सगळे शिवाजी महाराजांना मानतात. कोणाची काही बोलण्यात चूक झाली असेल तर त्यांनी काळजी घेतली पाहिजे. चूक सुधारायला हवी, गरज पडल्यास माफी ही मागितली पाहिजे अस मत किरीट सोमय्या ह्यांनी व्यक्त केलं आहे. आजपासून किरीट सोमय्या हे पतसंस्थेतील भ्रष्ट्राचार बाहेर काढणार आहेत. त्याची सुरुवात राष्ट्रवादी च्या मंचर येथून होणार असल्याचे त्यांनी सांगितलं आहे. पतसंस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची पिळवणूक होते, त्यांच्यावर अत्याचार केले जातात. म्हणून, पतसंस्थेच्या माध्यमातून भ्रष्ट्राचाराच्या विरोधात शुद्धीकरण ची कारवाई करण्यात येत आहे. अस किरीट सोमय्या यांनी सांगितलं.