लोणावळा इथे भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात संवाद साधण्यासाठी किरीट सोमय्या आले होते. भाषणात तसंच त्यानंतर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देतांना त्यांनी महाविकास आघाडीवर सडकून टीका केली. आता लवकरच महाविकास आघाडीतील नेत्यांच्या १०० कोटींचा कोविड घोटाळा काढणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. महाविकास आघाडीने मुंबई आणि पुण्यात कोविड सेंटर चालवण्याचे काम आपल्या नेत्यांना, नातेवाईकांना दिलं, जी कंपनी अस्तित्वात नाही अशांना दिलं, अनेक रुग्ण मृत्यूमुखी पडले, मुंबईच्या कोविड सेंटरमध्ये १०० कोटींचा घोटाळा केला, हा पैसा कुठून कुठे गेला हे जाहीर करणार असून त्यासंबंधीची तक्रार दाखल करणार आहे असं ते म्हणाले.
उद्धव ठाकरे ह्यांच उजवा हात जेलमध्ये गेला, आता डावा हात जाणार असं म्हणत ‘समजने वाले को इशारा काफी है’ असा इशारा सोमय्यांनी दिला आहे. उद्धव ठाकरे याचं सरकार हे माफियाराज होतं, त्यांच्या काळात एका कुटुंबाच भर चौकात मुंडन करण्यात आलं, नेवी ऑफिसर ने एक पोस्ट टाकली तर त्याला ही घरी जाऊन मारहाण करण्यात आली असं सोमय्या म्हणाले.
दरम्यान अजित पवार जेलमध्ये जाणार का? या प्रश्नावर सोमय्या यांनी प्रतिक्रिया ने देतो मिश्कील हास्य दिलं आणि पुढे निघून गेले.