लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : संतसाहित्य व ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक आणि राज्य सरकारच्या ज्ञानोबा तुकोबा पुरस्काराचे मानकरी किसन महाराज (वय ८६) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यामागे दोन मुलगे, मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे. साखरे यांच्या पार्थिवावर आळंदी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

Opportunity to do MBA online and remotely Savitribai Phule Pune University begins registration for entrance exam
ऑनलाईन, दूरस्थ पद्धतीने एमबीए करण्याची संधी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे प्रवेश परीक्षेसाठीची नोंदणी सुरू
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Kerala woman sentenced to death for poisoning her boyfriend
प्रियकराला विष दिल्याप्रकरणी २४ वर्षीय तरुणीला फाशीची शिक्षा; कोण आहे ग्रीष्मा एसएस? नेमके प्रकरण काय?
Saif Ali Khan attacker hid in garden of actors building
सैफवर हल्ला केल्यावर दोन तास त्याच इमारतीत होता आरोपी, पोलिसांनी दिली माहिती; म्हणाले, “त्याने त्याच्या भावाला…”
Image Of Donald Trump
Donald Trump : राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेताच ‘या’ दोन देशांना ट्रम्प यांचा दणका, फेब्रुवारीपासून आकारणार २५ टक्के अतिरिक्त आयात शुल्क
RG Kar rape-murder case verdict
RG Kar Rape-Murder Case : संजय रॉयला फाशीऐवजी जन्मठेप का झाली?
Image Of Atul Subhash Wife.
Atul Subhash Case : अतुल सुभाष यांच्या आईची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली, आरोपी पत्नीकडेच राहणार मुलाचा ताबा

आजोबा नाना महाराज साखरे आणि वडील दादा महाराज साखरे यांची संतसाहित्य अभ्यासाची परंपरा किसन महाराज यांनी पुढे नेली. त्यांचा जन्म पान चिंचोली (जि. लातूर) येथे झाला होता. कोणतेही औपचारिक शिक्षण न घेता बालवयात किसन महाराज यांना संतसाहित्याच्या अध्ययनाचे संस्कार लाभले.

आध्यात्म आणि तत्त्वज्ञान यांचे चिंतन ही किसन महाराजांची केवळ जीवननिष्ठा नव्हे तर श्रद्धा झाली होती. श्री क्षेत्र आळंदी येथील साधकाश्रमात गुरु-शिष्य परंपरेचा अंगीकार करून किसन महाराज यांनी संत साहित्य, तत्त्वज्ञान, व्याकरणशास्त्र याचे शिक्षण तत्त्वज्ञ एन. पी. मोडक यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हे शिक्षण घेतले. १९६० साली साधकाश्रमाची धुरा किसन महाराजांच्या हाती आली. तेव्हापासून साधकाश्रमात ज्ञानार्जनासाठी आलेल्या अनेक विद्यार्थ्यांना किसन महाराज यांनी संतसाहित्य आणि तत्त्वज्ञानाचे शिक्षण दिले. कीर्तन, प्रवचनाद्वारे महाराष्ट्राच्या खेडोपाड्यातून त्यांनी आध्यात्मिक उद्बबोधन अनेक वर्षे घडविले. कीर्तन, प्रवचन करणारे शेकड्यावर विद्यार्थी त्यांनी घडविले.

आणखी वाचा-ऑनलाईन, दूरस्थ पद्धतीने एमबीए करण्याची संधी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे प्रवेश परीक्षेसाठीची नोंदणी सुरू

मूल्याधिष्ठित शिक्षण प्रणालीच्या ध्यासातून मोफत बाल संस्कार शिबिरांची संकल्पना त्यांनी यशस्वीरित्या राबविली. गेली ५० वर्षे प्रती वर्षी मे महिन्यात बाल संस्कार शिबिराचा उपक्रम अव्याहतपणे सुरू आहे. श्रीमद्दभगवतगीता आणि ज्ञानेश्वरीच्या प्रचार, प्रसारासाठी किसन महाराजांनी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर वाराणसी, वृंदावन, रामेश्वर आदी ठिकाणी गीता ज्ञानेश्वरी  ज्ञानयज्ञाचे आयोजन अनेकवेळा केले. संतसाहित्य आणि तत्त्वज्ञानाच्या प्रचार, प्रसारासाठी आधुनिक तंत्रज्ञान अतिशय गरजेचे आहे हे लक्षात घेऊन किसन महाराजांनी प्रगत संगणक अध्ययन केंद्राच्या (सी-डक) माध्यमातून अध्यापनास सुरुवात केली. अनेक पदवीधर विद्यार्थ्यांना संगणक शास्त्रात शिक्षण देण्यात किसन महाराजांनी मोलाचे योगदान दिले. त्यांचे या क्षेत्रातील भरीव योगदान लक्षात घेऊन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक या विद्यापीठात त्यांनी मार्गदर्शक म्हणून काम केले. विविध विद्यापीठांमध्ये पीएच.डी आणि डी.लिट पदवीच्या परीक्षक मंडळावर सदस्य म्हणून किसन महाराज यांनी काम केले. आकाशवाणी केंद्रावरून आयोजित होणाऱ्या कीर्तन स्पर्धांचे परीक्षक म्हणूनही त्यांनी जबाबदारी स्वीकारली. गेली ४५ वर्षे स्वस्तिश्री या मासिकाचे संपादन ते करीत.

बुलढाणा जिल्ह्यातील हिवरा येथे आयोजित झालेल्या अखिल भारतीय किर्तनकार संमेलनाचे अध्यक्षपद साखरे यांनी भूषविले होते. राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले होते. ज्ञानेश्वरी वाचन मंदिर, रंगनाथ महाराज चॅरिटेबल ट्रस्टचे ते विश्वस्त होते. कीर्तन प्रवचनातून हजारो लोकांना व्यसनमुक्त करण्याचे सामाजिक कार्य किसन महाराजांनी केले. श्री क्षेत्र आळंदीच्या ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. अन्नछत्र, ग्रंथालय, भक्तनिवास अशा उपक्रमामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता.

आणखी वाचा-पिंपरी-चिंचवडमधील औद्योगिक क्षेत्र आता भयमुक्त, पोलिसांकडून औद्योगिक तक्रार निवारण पथकाची स्थापना

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संत ज्ञानेश्वर महाराज अध्यासन सुरू झाले त्याची मूळ प्रेरणा अध्यक्ष या नात्याने किसन महाराजांची होती. ग्रंथराज ज्ञानेश्वरीची दृकश्राव्य प्रत त्यांनी प्रकाशित केली आहे. किसन महाराजांनी संस्कृत आणि मराठीतून एकूण ११५ ग्रंथ लिहले आहेत. सार्थ ज्ञानेश्वरी, सार्थ एकनाथी भागवत, सार्थ तुकाराम महाराज गाथा, सार्थ भगवद्गीता, सार्थ ब्रह्मसूत्र, सार्थ उपनिषद, सोहम योग, ज्ञानेश्वर महाराज चरित्र  या सारखी ग्रंथ संपदा त्यांच्या लेखणीतून साकार झाली आहे. एकूण ५०० ताम्रपटांवर त्यांनी ज्ञानेश्वरी प्रकाशित केली आहे.

किसन महाराज साखरे यांना २०१८ मध्ये ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. पुरस्काराच्या पाच लाख रुपयाच्या रकमेत स्वतःचे एक लाख रुपये जमा करून ही रक्कम संस्कृतमध्ये शिक्षण घेणाऱ्या अभ्यासकासाठी देता यावी म्हणून ती किसन महाराजांनी राज्य सरकारला सुपूर्द केली. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने डी. लिट. पदवीने त्यांना सन्मानित केले आहे. नागपूरच्या जिजामाता प्रतिष्ठानचा जिजामाता गौरव पुरस्कार, वारकरी रत्न, मोरया पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

Story img Loader