पुणे: राज्यातील १४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. सुमारे २,०६८ महसूल मंडलात दुष्काळी परिस्थिती आहे. निम्म्या महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती असल्याचे शासकीय यंत्रणांनी मान्य केले आहे. या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या कृषी कर्जांचे पुनर्गठन न करता दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे, अशी मागणी किसान सभेच्या वतीने करण्यात आली आहे.

किसान सभेने म्हटले आहे, दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांत सरकारकडून कर्जाचे पुनर्गठन, शेती कर्ज वसुलीस स्थगिती, कृषी पंपांच्या वीजबिलात ३३.५ टक्के सलवत, अशा उपाययोजना केल्या जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण पीक वाया गेले आहे. कर्जांचे पुनर्गठन करणे आजचे मरण उद्यावर ढकलण्यासारखे आहे. शेतकऱ्यांनी पिकांसाठी घेतलेले कर्ज पिके नष्ट झाल्याने मातीमोल झाली आहेत. सरकारने ही परिस्थिती लक्षात घेऊन कर्ज पुनर्गठन न करता दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे.

Solapur jowar crops loksatta news
सोलापूर : ज्वारीच्या कोठारात यंदा ज्वारीचा पेरा निम्म्यावर, लांबलेल्या पावसाचा परिणाम
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Local fishermen save life of couple stuck in rough sea in ratnagiri
दाम्पत्याला भाट्ये समुद्रात खेळणे पडले महागात; स्थानिक मच्छीमारांनी वाचविले प्राण
Gondia known as Maharashtra s granary sees farmers shifting towards maize and gram this rabi season
धानाचे कोठार, पण शेतकऱ्यांचा कल मका, हरभऱ्याकडे
96000 hectares of onion crops fraudulently insured
कांद्याच्या बोगस पीकविम्याचे पेव फुटले; जाणून घ्या, जिल्हानिहाय कांद्याचा बोगस पीकविमा
Sugarcane Cultivation Kolhapur , Sugarcane ,
लोकशिवार… मुरमाड जमिनीतील उसाची दमदार लागवड
Mahesh Kharade warns of agitation as Rajarambapu Sugar Factorys Rs 3200 installment is invalid
राजारामबापू’च्या ऊसदरास शेतकरी संघटनांचा विरोध, ‘स्वाभिमानी’चा आंदोलनाचा इशारा
Nagpur Guardian Minister, Devendra Fadnavis,
नागपूरच्या पालकमंत्रीपदावरून तर्कवितर्क

हेही वाचा… राज्यात पुढील तीन दिवस गारठ्याचे

दुष्काळामुळे शेतकऱ्यांची खरिपाची पिके हाताची गेली आहेतच, शिवाय जमिनीत ओल नसल्याने दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये रब्बीचा हंगामही संकटात आला आहे. शेतकरी व शेतमजुरांच्या उपजीविकेचा गंभीर प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत कर्जमाफी, वीजबिल माफीबरोबरच शेतकरी, शेतमजुरांना उपजीविकेसाठी सरकारने तगाई देण्याची आवश्यकता आहे. दुष्काळग्रस्त भागातील कुटुंबांना उपजीविकेसाठी राज्य सरकारने किमान पाच हजार रुपये प्रतिमहा तगाई द्यावी, अशी मागणीही किसान सभेने केली आहे.

किसान सभेने केलेल्या मागण्या

  • पीकविमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना देय तातडीने द्यावीत.
  • चाऱ्याचा प्रश्न गंभीर आहे, सरकारने तत्काळ चारा छावण्या सुरू कराव्यात.
  • शेतमजुरांना व कारागिरांना रोजगार हमीची कामे उपलब्ध करून द्या.
  • विद्यार्थ्यांची संपूर्ण फी माफी करा.
  • दुष्काळ सदृश तालुक्यांत तातडीने दुष्काळ जाहीर करा.

Story img Loader