पुण्याच्या तळेगावमध्ये जनविकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची भर दिवसा पिस्तुलातून गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून निर्घृण हत्या केली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला असून अत्यंत क्रूरतेने कोयत्याने १८ वार केल्याचं या व्हिडिओत दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेमुळे अवघ्या पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.  याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसाच्या चार टीम आरोपींचा शोध घेत आहेत. कोयत्याने वार करण्यापूर्वी आवारे यांच्यावर पाठीत आणि पोटात पिस्तूलातून गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. अशी माहिती पिंपरी- चिंचवड पोलिसांनी दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर आवारे हे जनविकास समितीचे संस्थापक अध्यक्ष असून ते आज (शुक्रवारी) तळेगावच्या नगर परिषदेत साडेबाराच्या सुमारास आले होते. नगर परिषदेचे सीईओ यांची भेट घेऊन ते नगर परिषदेच्या बाहेर पडले. तेव्हा दबा धरून बसलेल्या पाच ते सहा जणांनी त्यांच्यावर हल्ला केला. दरम्यान, अगोदर त्यांच्या पाठीत मग पोटात पिस्तुलाने गोळी झाडण्यात आली. निपचिप पडलेल्या किशोर आवारे यांच्यावर दोघांनी कोयत्याने सपासप १८ वार केले तर दोघे किशोर आवारे यांचा मृत्यू झाल्याचं तपासत होते. अस स्पष्ट त्या व्हिडिओमध्ये दिसत आहे. या घटनेनंतर दोन दुचाकीवरून आरोपी पसार झाले आहेत. या घटनेमुळे कायदा आणि सुव्यवस्था निर्माण झाली आहे. पोलिसांच्या कार्यक्षमतेवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दीड महिन्यापूर्वी शिरगाव येथे विद्यमान सरपंच प्रवीण गोपाळे यांची हत्या करण्यात आली होती. त्यामुळे पुण्याच्या मावळमध्ये नेमकं काय सुरू आहे असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kishor avare murder gun shoot brutal killing in pimpri chinchwad kjp 91 ysh