अवकाळी पावसामुळे हाताला आलेल पीक गेल्याने राज्यातील अनेक शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. या सर्व घडामोडी घडत असताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पुण्यात राहणार्‍या शैलेश मोडक या तरुणाने आयटीतील अडीच लाख रूपयांची नोकरी सोडून वारजे हायवे लगत, केवळ १६० स्क्वेअर फुटच्या कंटेनरमध्ये चक्क केशरचे पीक घेतले आहे. या अनोख्या शेतीची आणि त्यातही कंटेनरमध्ये केशरचे पीक घेणार्‍या शैलेशची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू आहे.

हेही वाचा- पुणे: भटके-विमुक्त जाती-जमातींचे ११ डिसेंबरला राज्यस्तरीय अधिवेशन

crores of revenue is not being collected in Gadchiroli due to sand smugglers instalments
विकासात राज्याचा पहिला जिल्हा होऊ पाहणाऱ्या गडचिरोलीत वाळू तस्करांच्या हप्त्यांमुळे…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
tur dal price , tur dal price sangli , tur dal,
तूरडाळ सामान्यांच्या आवाक्यात !
tur dal cost decrease by rs 50 per kg other pulses price drop
तूरडाळ किलोमागे ५० रुपयांनी स्वस्त
farmer cabbage farm destroyed
कोल्हापूर : दर घसरल्याने शेतकऱ्याने कोबीवर ट्रॅक्टर फिरवला
Pramod kumar Success Story
Success Story : ‘स्वप्न एका रात्रीत पूर्ण होत नाही!’ केवळ २,५०० केली व्यवसायाची सुरुवात; मेहनतीच्या जोरावर उभारली ५० कोटींची कंपनी
Excessive use of chemical fertilizers disrupts the natural chain says MLA Arun Lad
रासायनिक खतांच्या बेसुमार वापरामुळे निसर्ग साखळी विस्कळीत – आमदार अरूण लाड
Raigad district administration will implement bamboo cluster scheme planting 35 lakh bamboos
रायगडात ३५ लाख बांबूची लागवड होणार

याबाबत शैलेश मोडक यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, मी मूळचा नाशिक येथील असून पुण्यात कॉम्प्युटर सायन्सच शिक्षण घेतले. त्यानंतर १३ वर्ष ८ ते १० देशात सॉफ्ट्वेअर कंपनीमध्ये काम केले. रोजच तेच काम करून वैताग आला होता.काही तरी वेगळ काम करण्याची इच्छा कुटुंबातील व्यक्तींना बोलावून दाखवली.पण त्यासाठी मला काम सोडाव लागल,असे सांगितले.एवढ्या मोठ्या पगाराची नोकरी सोडू नकोस असे त्यावेळी सर्वांनी सांगितले. पण मी माझ्या निर्णयावर ठाम असल्याचे, सर्वाच्या लक्षात आल्यावर माझ्या कामाला कुटुंबीयांसह मित्रांनी देखील पाठिंबा दिला.

त्याच दरम्यान खादी ग्रामोद्योग येथे मधमाशा पालनचा कोर्स केला. तेथूनच ६० पेट्या खरेदी केल्या आणि त्याच पेट्या शेतकर्‍यांना भाड्याने देण्यास सुरुवात केली. या व्यवसायाला पुणे जिल्ह्यातील सासवड भागातील अनेक शेतकर्‍यांनी चांगला प्रतिसाद दिला.तेथील शेतकऱ्यांच्या सतत संपर्कात असल्याने कोणत्या हंगामात कोणत पीक घेतले पाहिजे. याबाबत शेतकर्‍यांकडून मला सतत माहिती मिळत राहिली. शेतकर्‍यांना मधमाश्याचे बॉक्स द्यायचो. त्यामध्ये मध मोठ्या प्रमाणावर तयार होत होते. तेच मध शहरातील अनेक भागात विक्रीच काम देखील केले. यातून चांगले पैसे मिळत होते.
त्याच दरम्यान मी इम्पोर्टेड एक्सपोर्टचा व्यवसाय केला. त्यावेळी आपण कंटेनरमध्ये शेती संदर्भात उत्पादन घेऊ शकतो का ? यावर विचार सुरू होता. त्याबद्दल अनेकांशी चर्चा करून ३६० स्क्वेअर फूटचा कंटेनर विकत घेतला आणि मातीचा वापर न करता. विविध विदेशी भाज्यांच पीक घ्यायच ठरवले. त्यानुसार वर्षभरामध्ये ४ ते ५ हजार झाडे लावली. कोणतही पीक घ्यायच म्हटल्यावर पिकांना चांगला सूर्यप्रकाश मिळणे आवश्यक असते. आपण कंटेनरमध्ये शेती करीत असल्याने एलईडी लाईटचा वापर करून सूर्यप्रकाश देण्याच काम केल, त्यानंतर या पिकांना सूक्ष्म नियोजन करून दिवसाला ४० लीटर पाण्याचा वापर झाला. त्यामुळे ९० टक्के पाण्याची बचत होण्यास मदत झाली. तर हे कंटेनर ३२० स्क्वेअर फूट होते. त्या एवढ्याशा जागेतून आम्ही एक एकर जागेच पीक घेण्यात यश आल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा- पुणे – नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्प केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत; महारेल रेल्वेमंत्र्यांकडे भूमिका स्पष्ट करणार

आपल्या देशात १०० टन केशरची मागणी, पण आपल्याकडे केवळ ४ टन उत्पादन

आम्ही विविध भाज्यांच पीक घेण्यात यशस्वी ठरल्यानंतर, नवीन पीक घ्यायला पाहिजे हा विचार सुरू होता. त्यावेळी आपल्या देशात १०० टन केशरची मागणी असून आपल्याकडे केवळ ४ टन केशरचे उत्पादन होते.आपल्याकडे श्रीनगर येथील पंम्पोर जिल्हय़ात केशरचे सर्वाधिक पीक घेतले जाते अशी माहिती मिळाली. तर उर्वरित इराण, नेदरलॅंड आणि अरब देशातून केशरची आयात होते.हे लक्षात घेऊन आपण कंटेनरमध्ये देखील हे उत्पादन घेतले जाऊ शकतो का ? याबाबत अनेकांशी चर्चा केली. त्यानंतर श्रीनगर येथील पंम्पोर जिल्हय़ात केशरचे सर्वाधिक पीक घेणार्‍या शेतकरी, विविध मंडळीसोबत चर्चा करून कंटेनरच्या ३२० स्क्वेअर फूट जागेपैकी १६० स्क्वेअर फूट जागेत उत्पादन घेण्याच ठरविले. त्यानुसार तेथून ५०० किलो कंद ऑर्डर करण्यात आले. कंटेनरच्या आतील बाजूची रचना करताना आतमध्ये ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात श्रीनगर येथील पंम्पोर जिल्हय़ात असलेल्या वातावरणाचा टाईमटेबल लावण्यात आला.झाडाला लागणारा कार्बन डायऑक्साईडचा लागणारा (सिलेंडर), आद्रता निर्माण करणार उपकरण, कंटेनरमध्ये ठेवण्यात आले. तसेच आतील सर्व गोष्टीवर मोबाईलवरून नियंत्रण ठेवले जात आहे.तेथील वातावरणानुसार कंटेनरमध्ये पीक घेण्यात आले आहे.एक ते दीड किलो केशरच्या उत्पादनासाठी २२ गुंठयाची म्हणजेच अर्धा एकर जागेची आवश्यकता असते. मात्र आम्ही १६० स्क्वेअर फूट जागेत ते उत्पादन घेण्यात यशस्वी ठरलो असल्याने विशेष आनंद असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा- पुणे जिल्ह्यातील २३८ गावांमधील पुनर्वसनासाठी राखीव शेरे हटवले; जमिनींच्या खरेदी-विक्रीला मान्यता

तसेच ते पुढे म्हणाले की, सध्य स्थितीला १ किलोपर्यंतच उत्पादन झालं असून ४०० ते १२०० रूपयांपर्यन्त १ ग्रॅम विक्री करणार आहोत. तसेच १ किलोची सध्याच्या बाजारात सरासरी ५ ते ५.५० लाख एवढी किंमत होते. मला या उत्पादनासाठी ८ ते १० लाख रुपयांचा खर्च आला असून यासाठी प्रामुख्याने लागणारे एका कंदचे आयुष्य ७ ते ८ वर्ष असल्याने, वर्षभरात अनेक वेळा उत्पादन घेणे शक्य आहे. त्यामुळे दीड वर्षात गुंतवलेले पैसे परत मिळू शकणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Story img Loader