नायजेरियातील तरुणाला बेदम मारहाण करुन त्याच्यावर चाकूने वार केल्याची घटना हांडेवाडी परिसरात घडली. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपी मूळचे नायजेरियातील आहेत. मायकेल ओकेलू चुकूमेका (वय ३७, मूळ रा. नायजेरिया) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी संडे विल्यिम्स (वय ३२), ब्लेसिंग (वय ३०), थाॅमसन (वय ३८), फ्रेड (वय २५) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : देशासमोर हिंदुत्वाचे मोठे आव्हान ; डाॅ. बाबा आढाव यांचे मत

मायकेल याने या संदर्भात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी आणि मायकेल ओळखीचे आहेत. आरोपी मूळचे नायजेरियातील आहेत. हडपसर भागातील हांडेवाडीतील एका सोसायटीत ते राहायला आहेत. आरोपी आणि मायकेल यांच्यात किरकोळ कारणावरुन वाद झाला होता. आरोपींनी मायकेलला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्याच्यावर चाकूने वार केले. पोलीस उपनिरीक्षक हंबीर तपास करत आहेत.