वाचनामुळे वर्तमान-भूतकाळातील सर्व माहिती आपल्याला संदर्भासाहित आणि सखोल मिळते म्हणूनच आजच्या या डिजिटलच्या युगातही अनेकजण पुस्तकं हातात घेऊन वाचण्याला पसंती देतात. आज ‘गोष्ट पुण्याची’च्या भागात वाचन संस्कृती जपणाऱ्या आणि वाढवणाऱ्या पुण्यातील सर्वात जुन्या ग्रंथालयाला आपण भेट देणार आहोत त्या ग्रंथालय-वाचनालयाचं नाव आहे ‘पुणे नगर वाचन मंदिर’. १८४८ साली बुधवार वाड्यात स्थापन झालेल्या या ग्रंथालयाचे तेव्हाचे नाव ‘पूना नेटिव्ह जनरल लायब्ररी’ असे होते. काय आहे या वास्तूचा इतिहास चला जाणून घेऊ

Story img Loader