पुणे : गुंड शरद मोहोळवर याच्यावर भरदिवसा पिस्तुलातून गोळ्या झाडून खून करण्यात आल्यानंतर शहरात पुन्हा टोळीयुद्ध भडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मोहोळच्या खुनानंतर शहरातील टोळीयुद्ध रोखण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

जमिनीच्या वादातून मोहोळचा पूर्वीचा साथीदार साहिल ऊर्फ मुन्ना संतोष पोळेकर (रा. सुतारदरा, कोथरुड) आणि साथीदारांनी खून केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारणे टोळीतील गुंड किशोर मारणे, संशयित दहशतवादी कातिल सिद्दीकी आणि मेरठमधील एक खूनप्रकरण, मुळशीतील दासवे गावाचे सरपंच शंकर धिंडले यांचे अपहरण करून ४५ लाखांची खंडणी उकळल्यानंतर मोहोळने गुन्हेगारी वर्तुळात दबदबा निर्माण केला.

maharashtra assembly election 2024 issue of bullying is effective in campaigning in three constituencies of Marathwada
मराठावाड्यातील तीन मतदारसंघांत गुंडगिरीचा मुद्दा प्रचारात प्रभावी
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Amit Shah on Uddhav Thackeray
Amit Shah : “उद्धव ठाकरे तुमच्यात दम असेल तर…”, अमित शाहांचं भर सभेत खुलं आव्हान, म्हणाले…
sushma andhare
Sushma Andhare: ‘केलंय काम भारी’वरून अंधारेंचा हल्लाबोल, अंबरनाथच्या सभेत आमदार किणीकरांसह शिंदे गटातील गटबाजीवरही बोट
mla ashok pawar son kidnapped
Ashok Pawar: आमदार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण करून दहा कोटींची खंडणी, अश्लील चित्रफीत प्रसारित करण्याची धमकी
kopri pachpakhadi vidhan sabha election 2024
मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात काँग्रेसच्या बंडखोराला दोन ते तीन कोटी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांचा गंभीर आरोप
bombay hc reject builder bail over illegal housing projects
बेकायदा गृहप्रकल्प राबवणाऱ्यांवर कारवाई गरजेची; विकासकांना जामीन नाकारताना उच्च न्यायालयाची टिप्पणी
thane model code of conduct crime loksatta news
आचारसंहिता भरारी पथकाचीच खंडणीखोरी, शेतमालाच्या पैशांवर डल्ला, १३ दिवसांनंतर गुन्हा दाखल

पुणे शहर आणि परिसरात २००० मध्ये मूळचे मुळशीतील असलेले आणि शहरात वास्तव्याला असलेल्या गणेश मारणे, गजानन मारणे, संदीप मोहोळ यांच्या टोळ्या उदयाला आल्या. मुळशीतील जमीन व्यवहार आणि वर्चस्वाच्या वादातून टोळ्यांमध्ये खटके उडू लागले. त्यातून शुक्रवार पेठेतील अनिल मारणे आणि नवी पेठेतील सुधीर रसाळ यांचे खून झाले. ४ ऑक्टोबर २००४ मध्ये संदीप मोहोळ याचा कोथरूडमधील पौडफाटा परिसरात भरदिवसा गोळ्या घालून खून करण्यात आला. याप्रकरणी गणेश मारणे आणि त्याच्या १७ साथीदारांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. या खटल्याचा निकाल चौदा वर्षांनी लागला. त्यामध्ये सचिन निवृत्ती पोटे, जमीर मेहबूब शेख, संतोष रामचंद्र लांडे यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. अन्य सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली.

हेही वाचा : मोठी बातमी : शरद मोहोळ खून प्रकरणात दोन वकील सामील, आरोपींसह वकील अटकेत

शरद मोहोळ हा संदीप मोहोळच्या गाडीवर चालक म्हणून काम करायचा. त्याच्या खुनानंतर टोळीची धुरा शरदने सांभाळली. संदीपच्या खुनाचा बदला म्हणून त्याने गणेश मारणे टोळीतील किशोर मारणे याचा खून केला. नीलायम चित्रपटगृहाजवळील एका बारमध्ये झालेल्या खुनामुळे शहरात खळबळ उडाली. या गुन्ह्यात शरद मोहोळ, हेमंत दाभेकर, दत्ता गोळे, योगेश गुरव, मुर्तझा शेख, अमित फाटक, दीपक भातरंबेकर यांना जन्मठेपेची शिक्षा झाली.

मोहोळ याने ४५ लाख रुपये खंडणीसाठी दासवे गावाचे सरपंच शंकर धिंडले यांचे अपहरण केले. त्या गुन्ह्यात तो आणि त्याचा साथीदार उत्तर प्रदेशात पसार झाले होते. मेरठमध्येही दोघांनी एकाचा खून केला. या खटल्याची सुनावणी अद्याप सुरु आहे. फरारी मोहोळ याला अटक केल्यानंतर त्याला येरवडा कारागृहातील अंडा सेलमध्ये ठेवण्यात आले होते. ८ जून २०१२ रोजी मोहोळ आणि भालेराव यांनी जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील संशयित आरोपी कतिल सिद्दीकी याचा येरवड्यातील अंडा सेलमध्ये खून केला.

हेही वाचा : कोण होता शरद मोहोळ? वाचा ‘हिंदू डॉन’ अशी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शरदची रक्तरंजित कहाणी…

गेल्या काही वर्षांपासून मुळशीतील गुंड विठ्ठल शेलार आणि शरद मोहोळ यांच्या टोळ्यांमध्ये वैर निर्माण झाले होते. त्यातून मोहोळ याच्या साथीदारांनी शेलारवर हल्ला केला होता. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.