पुणे : शरद मोहोळ खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार गणेश मारणे पसार झाला असून, मारणेचा गुन्हे शाखेच्या पथकांकडून शोध घेण्यात येत आहे. मोहोळ खून प्रकरणात मुख्य सूत्रधार म्हणून गणेश मारणेचे नाव निष्पन्न झाल्यानंतर मारणे पुन्हा चर्चेत आला आहे.

पुण्यातील गुन्हेगारी विश्वात गणेश मारणे आणि गजानन मारणे या दोन टोळ्या सक्रिय आहेत. गेल्या काही वर्षांपासून गणेश फारसा चर्चेत नव्हता. गणेश आणि गजानन दोघे मूळचे मुळशी तालुक्यातील आहेत. ४ ऑक्टोबर २००६ रोजी पौड फाटा चौकात संदीप मोहोळवर गोळ्या झाडण्यात आला. मोहोळचा खून गणेश मारणे आणि साथीदारांनी केल्याचे तपासात उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली. गणेश मूळचा मुळशी तालुक्यातील आहे. तो एरंडवणेतील खिलारेवाडी वसाहतीत राहायला होता. मोहोळ खून प्रकरणानंतर मारणे चर्चेत आला.

Vikas Walkar Shraddha Walkar father death
श्रद्धा वालकरच्या अस्थिविसर्जनाचे कार्य अधुरेच राहिले, वडिल विकास वालकर यांनी घेतला जगाचा निरोप
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Marijuana worth six lakh rupees seized in Parbhani
परभणीत सहा लाख रुपये किमतीचा गांजा जप्त
nashik in Somnath suryavanshis death case five policemen were suspended others will be investigated
परभणी कोठडीतील मृत्यू प्रकरणी अन्य पोलिसांचीही चौकशी, आश्वासनानंतर परभणी-मुंबई पदयात्रा स्थगित
Shirdi double murder news in marathi
शिर्डीत साई संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांची हत्या; एक जखमी ; लुटमारीचा संशय, संशयीत ताब्यात
pune crime news
पुणे : लग्नाची मागणी केल्याने बेदम मारहाणीत एकाचा मृत्यू, गोखलेनगर भागातील घटना
Pune Municipal Corporation contract employee stabbed to death over immoral relationship in Kothrud
कोथरूडमध्ये अनैतिक संबंधातून तरूणाचा खून, पोलिसांकडून संशयित आरोपी ताब्यात
old man attacked with iron rod after dispute over financial affairs of running Bhisi
भिशीच्या वादातून लोखंडी सळईने वृद्धाचा खून; महिलेसह दोघे अटकेत

मोहोळचा खून वर्चस्व आणि वैमनस्यातून झाल्याचे तपासात उघडकीस आले होते. बाबा बोडके टोळीची धुरा सांभाळणाऱ्या संदीपने प्रतिस्पर्धी टोळीतील म्होरक्यांना टिपून गुन्हेगारी विश्वात दबदबा निर्माण केला होता. कोंढव्यातील कमेला भागात मोहोळ आणि साथीदारांनी शुक्रवार पेठेतील अनिल मारणेचा खून केला होता. मोहोळचे गुन्हेगारी विश्वातील वर्चस्व मोडून काढण्यासाठी गणेश, त्याचे साथीदार सचिन पोटे यांनी मोहोळच्या खुनाचा कट रचला.

मोहोळचा खून केल्यानंतर गणेश चर्चेत आला होता. मोहोळच्या खुनाचा बदला घेण्यासाठी शरद मोहोळ आणि साथीदारांनी तयारी सुरू केली होती. निलायम चित्रपटगृहाजवळील एका उपहारगृहात किशोर मारणेचा शरद मोहोळ आणि साथीदारांनी खून केला. किशोर गणेश मारणेचा जवळचा साथीदार होता. वीस वर्षानंतर गणेश मारणे, त्याचा साथीदार विठ्ठल शेलार यांनी किशोर मारणेच्या खुनाचा बदला घेतल्याची चर्चा गुन्हेगारी विश्वात सुरू आहे.

हेही वाचा : ललित पाटीलचा ससूनमधील मुक्काम कसा वाढला? तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजीव ठाकूर यांच्या जबाबातून माहिती उघड

संदीप मोहोळ खून प्रकरणात गणेश मारणेसह १७ साथीदारांविरुद्ध गुन्हादाखल करण्यात आले. या खटल्याचा निकाल चौदा वर्षांनी लागला. मोहोळ खून खटल्यात सचिन निवृत्ती पोटे, जमीर मेहबूब शेख, संतोष रामचंद्र लांडे यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. गणेश मारणेसह अन्य आरोपींची निर्दोष मुक्तता झाली होती.

Story img Loader