पुणे : कोथरुडमध्ये गुंड शरद मोहोळ याचा पिस्तुलातून गोळ्या झाडून खून करण्यात आला. जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी कातिल सिद्दीकीचा येरवड्यातील अतिसुरक्षित अंडासेलमध्ये कतिलचा मोहोळ आणि साथीदारांनी पायजम्याच्या नाडीने गळा आवाळून खून केला. कातिलच्या खुनानंतर देशभर शरद मोहोळ चर्चेत आला. गुंड संदीप मोहोळ याचा शरद मोहोळ विश्वासू साथीदार होता.
संदीपचा ४ ऑक्टोबर २००६ रोजी पौड फाटा चौकात भरदिवसा गोळ्या झाडून प्रतिस्पर्धी टोळीने खून केला होता. त्यानंतर शरद मोहोळ आणि साथीदारांनी निलायम चित्रपटगृह परिसरातील एका उपहारागृहात प्रतिस्पर्धी गणेश मारणे टोळीतील किशोर उर्फ पिंटू मारणे याच्यावर गोळीबार करुन खून केला होता. त्यानंतर येरवडा कारागृहातील अंडा सेलमध्ये जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी कतिल सिद्धीकी याचा पायजम्याच्या नाडीने गळा आवळून खून केला होता.
याप्रकरणात मोहोळ आणि त्याचा साथीदार अलोक भालेराव यांना अटक करण्यात आली होती. अतिसुरक्षित समजल्या जाणाऱ्या येरवड्यातील अंडा सेलमध्ये माेहोळ आणि भालेराव यांनी कतिलचा खून केल्यानंतर तो देशभर चर्चेत आला होता. सिद्धीक खून प्रकरणात तपास यंत्रणांकडून मोहोळची याप्रकरणात चौकशी करण्यात आली होती.
हेही वाचा : कोथरुडमधील सराईत गुंड शरद मोहोळचा गोळीबारात मृत्यू; हल्लेखोर पसार
२६ जून २०१६ रोजी न्यायालयाने कतिल सिद्धीकी प्रकरणात मोहोळ अणि भालेरावची निर्दोष मुक्तता केली. त्यानंतर मोहोळ विविध राजकीय आणि सामाजिक कार्यक्रमात सहभागी होऊ लागला. त्याची पत्नीने भारतीय जनता पक्षाचे काम सुतारदरा परिसरात सुरू केले.