पुणे : त्रास देणाऱ्या सासूला अद्दल घडविण्यासाठी चोरीचा बनाव रचणाऱ्या सुनेसह चौघांना कोंढवा पोलिसांनी अटक केली. सासूला मारहाण करण्यास सांगून सुनेने साथीदारांच्या मदतीने घरातील दागिने लुटले होते.

या प्रकरणी सून हुमेरा आवेश शेख (वय ३०, रा. मीठानगर, कोंढवा), अब्दुलसाब दस्तगीर मुल्ला (वय १९) कासीम बुऱ्हानसाब नाईकवडी (वय २१), मेहबूबसाब अब्दुलसाब बदरजे (वय २५, तिघे रा. गुलबर्गा, कर्नाटक) यांना अटक करण्यात आली. याबाबत सासू बिल्किस मोहम्मद ईसाक शेख (रा. मीठानगर, कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. २ फेब्रुवारी रोजी बिल्कीस, त्यांचे पती मोहम्मद, सून हुमेरा आणि नातू घरात होते. बिल्कीस यांचे पती मोठ्या नातवाला शाळेतून आणण्यासाठी बाहेर पडले होते. मुलगा कामानिमित्त सकाळी घरातून बाहेर पडला होता. त्या वेळी आरोपी कासीम, मेहबूबसाब, अब्दुलसाब बिल्कीस शेख यांच्या घरात शिरले. बिल्कीस यांना धमकावून बिल्कीस यांच्या हातातील सोन्याच्या बांगड्या आणि सून हुमेरा हिच्या गळ्यातील दागिने चोरट्यांनी हिसकावले. भरदिवसा लुटमार झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

हेही वाचा – “अमित शाहंच्या पायाखालची जमीन सरकली असल्याचं दिसत आहे”; कसबा विधानसभा पोटनिवडणुकीवरुन नाना पटोले यांची टीका

चौकशीत हुमेराने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांकडून समांतर तांत्रिक तपास सुरू करण्यात आला होता. तपासात चोरटे कर्नाटकात पसार झाल्याची माहिती पोलीस कर्मचारी महेश वाघमारे यांना मिळाली. त्यानंतर तिघा आरोपींना कर्नाटकातून अटक करण्यात आली. दरम्यान, हुमेराच्या चौकशीत तिने सासू त्रास देत होती. ती दागिने वापरास देत नसल्याने साथीदारांच्या मदतीने घरात लूटमार करण्याचा बनाव रचल्याची कबुली दिली.

हेही वाचा – पुणे : कोयता गँगच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या : दोघांना शिरुरमध्ये पाठलाग करुन पकडले

कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, गुन्हे शाखेचे निरीक्षक संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अनिल सुरवसे, अमोल हिरवे, महेश वाघमारे, गणेश चिंचकर, राहुल रासगे, अभिजीत रत्नपारखी, राहुल थोरात यांनी ही कारवाई केली.

Story img Loader