पुणे: दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला कोंढवा पोलिसांनी अटक केली. चोरट्याकडून पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. अमन अलीम शेख (वय २५, रा. नवाजिश पार्क, कोंढवा खुर्द) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शेखने शहरातील वेगवेगळ्या भागातून दुचाकी चोरल्या होत्या. तो दुचाकी विक्रीच्या तयारीत असल्याची माहिती कोंढवा पोलिसांच्या पथकाला मिळाली. पोलिसांनी सापळा लावून शेखला पकडले. चौकशीत त्याने पाच दुचाकी चोरल्याची कबुली दिली.

हेही वाचा… प्रदूषण रोखा अन्यथा काम बंद… पुणे महापालिकेने महामेट्रोला का दिला हा इशारा?

पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलीस निरीक्षक संजय मोगले, सहायक निरीक्षक दिनेश पाटील, अमोल हिरवे, राहुल वंजारी, सुहास मोरे, राहुल थोरात, अभिजीत रत्नपारखी आदींनी ही कारवाई केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kondhwa police arrested the thief and seized five bikes in pune print news rbk 25 dvr
Show comments