पुणे : पत्नीला तोंडी तलाक देणाऱ्या पतीविरुद्ध कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. व्यवसाय सुरू करण्यासाठी माहेरहून ५० लाख रुपये आणण्याची मागणी करून छळ केल्याप्रकरणी पोलिसांनी पतीसह नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – राज्यात मालमत्ता खरेदी-विक्री जोरात, मुद्रांक शुल्कापोटी तब्बल ३८ हजार कोटींचा महसूल

हेही वाचा – पुणे महापालिकेचे ९५०० कोटींचे ‘फुगवलेले’ अंदाजपत्रक; करवाढ नसल्याने पुणेकरांना दिलासा, सर्वाधिक खर्च पाणीपुरवठा योजनांवर

या प्रकरणी पती अबजूर सलीम शेख, नणंद बुशारा, सासू शेरबानो, हुमा, सासरे समीर शेख यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका विवाहित तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी अबजूर याचा दोन वर्षांपूर्वी तरुणीशी विवाह झाला होता. अबजूरने व्यवसाय सुरू करण्यासाठी माहेरहून ५० लाख रुपये आणण्याची मागणी तरुणीकडे केली होती. तिचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू केला. त्याने पत्नीशी अनैसर्गिक कृत्य केले. पत्नीशी भांडण करून अबजूर तीन वेळा तलाक असे म्हणाला. तरुणी गर्भवती असताना तिला वडिलांच्या घरी पाठवून दिले. पोलीस उपनिरीक्षक शेख तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kondhwa police registered a case against the husband who verbally divorced his wife pune print news rbk 25 ssb