पुणे : यंदाच्या निकालातही कोकण विभागाने वर्चस्व राखले. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९८.११ टक्के, तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी ९२.०५ टक्के आहे. राज्यात ६६ हजार विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. तर, १ लाख ९,३४४ विद्यार्थ्यांना ८५ ते ९० टक्के गुण मिळाले आहेत.
१५१ विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी
दहावीच्या विद्यार्थ्यांना कला आणि क्रीडा विषयातील प्रविण्यासाठी अतिरिक्त गुण देण्यास सुरुवात झाल्यापासून राज्यात विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळू लागले. यंदा राज्यातील १५१ विद्यार्थ्यांना १०० टक्के मिळाले असून, त्यातील १०८ विद्यार्थी लातूर विभागातील आहेत, तर ६ विद्यार्थी मुंबई विभागातील आहेत.
दहावीच्या परीक्षेवेळी करोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला असला, तरी परिस्थिती आव्हानात्मक होती. विद्यार्थ्यांनी या आव्हानात्मक परिस्थितीला सामोरे जात परीक्षा दिली ही महत्त्वाची बाब आहे. सर्व घटकांच्या सहकार्यामुळे दहावीच्या परीक्षेचे आयोजन करणे शक्य झाले. पुढील परीक्षा पूर्ण अभ्यासक्रमावर आणि पारंपरिक पद्धतीनेच आयोजित करण्यात येईल. – शरद गोसावी, अध्यक्ष, राज्य मंडळ