पुणे : कोरेगाव पार्क भागातील एका खासगी कंपनीतील रोखपालाने दोन कोटी रुपयांचा अपहार केल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी रोखपालाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याबाबत खासगी कंपनीचे मालक जिनेंद्र दिलीप दोशी (वय ३८, रा. कोरेगाव पार्क) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रोखपालााविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोशी यांची जेनसिस इव्हेंट मॅनेंजमेंट कंपनी आहे. या कंपनीचे कार्यालय कोरेगाव पार्क भागात आहे. रोखपालाने दोशी आणि त्यांचा भागीदारांना विश्वासात घेऊन कंपनीतील सर्व आर्थिक व्यवहार ताब्यात घेतले. कर भरण्याबाबतच्या बनावट नोंदी करुन रोखपालाने दोन कोटी रुपयांचा वेळोवेळी अपहार केला.

हेही वाचा – पुणे : मोटारीची काच फोडून साडेदहा लाखांची रोकड चोरी, विमाननगर भागातील घटना

हेही वाचा – वाल्मिक कराड प्रकरण : पुण्यातील भाजपचे माजी नगरसेवक दत्ता खाडे याची सीआयडी कडून दोन तास चौकशी

संबंधित रक्कम रोखपालाने स्वत:च्या बँक खात्यात, तसेच नातेवाईकांच्या खात्यात हस्तांतरित केली. लेखापरीक्षणात नुकताच हा प्रकार उघडकीस आल्यानंतर दोशी यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक चेतन मोरे तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Koregaon park private company embezzlement of money pune print news rbk 25 ssb