कोथरूड विधानसभा मतदारसंघ
शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे प्राबल्य असलेल्या कोथरूड विधानसभा मतदार संघात महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पहिल्यापासूनच वर्चस्वाची लढाई असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे युती होवो अगर न होवो दोन्ही पक्षांनी स्वबळावरच लढण्याची तयारी केली होती. त्यातच आता युती संपुष्टात आल्यामुळे या मतदारसंघातील प्रभागांमध्ये तर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यात सरळ लढत होणार हे निश्चित आहे. त्यामुळेच कोथरूड मतदार संघातील सहा प्रभागात होणारी निवडणूक ही दोन्ही पक्षांसाठी निर्णायक आणि वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठीचीच असल्याचे चित्र आहे. त्यामुळेच शहरातील अन्य कोणत्याही प्रभागापेक्षा कोथरूड मतदार संघात धक्कादायक निकाल लागणार, का आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांचे वर्चस्व निर्माण होणार, का सेना मुसंडी मारणार, याची चर्चा आहे.
कोथरूड विधानसभा मतदार संघात भाजप आणि शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे. सध्या या मतदार संघात अकरा प्रभाग आहेत. त्यातील बावीसमध्ये शिवसेनेचे चार आणि भाजपचे तीन नगरसेवक असे राजकीय बलाबल आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचेही येथे नगरसेवक असले, तरी भाजप-सेनेलाच मानणारा मोठा वर्ग या मतदारसंघात आहे. अडीच वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत युती तुटल्यामुळे या मतदार संघातून प्रा. मेधा कुलकर्णी या विजयी झाल्या. त्यापूर्वी शिवसेनेचे चंद्रकांत मोकाटे यांनी या मतदार संघात आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले. सेनेला या मतदार संघात पुन्हा वर्चस्व प्राप्त करायचे आहे. त्यामुळेच या दोन्ही पक्षात सातत्याने कुरबुरी सुरू असल्याचे गेल्या अडीच वर्षांत दिसून आले आहे. विशेषत: भाजपच्या आमदार कुलकर्णी यांची कोंडी करण्याची संधी सेनेच्या स्थानिक नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी क्वचितच सोडली असेल. विधानसभा निवडणुकीनंतर या प्रभागातील राजकीय समीकरणेही तत्काळ बदलली.
महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर प्रथमपासूनच युती नको, अशीच मागणी येथील दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून होत होती. युती नको, या मागणीला जागा वाटपाचेच कारण होते, हेही स्पष्ट होते. सध्या या दोन्ही पक्षात इच्छुकांची संख्या मोठी आहे. युती झाली तर मित्र पक्षाला जागा सोडण्यास कोणीच तयार होणार नव्हते. युती झाली असती, तर त्या दृष्टीनेही राजकीय समीकरणे जमविण्यास सुरुवात झाली होती. त्याचा फटका कदाचित या दोन्ही पक्षाच्या काही उमेदवारांनाही बसण्याची शक्यता होती. आता मात्र एका दिवसात परिस्थिती बदलली आहे. युती तुटल्यामुळे आता मयूर कॉलनी-डहाणूकर कॉलनी, एरंडवणा-हॅपी कॉलनी, कर्वेनगर, बावधन-कोथरूड डेपो, रामबाग कॉलनी-शिवतीर्थनगर या प्रभागात तुल्यबळ लढती पाहायला मिळणार आहेत. महापालिका निवडणुकीची प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर काही जणांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांची उमेदवारी मिळण्याचा मार्गही मोकळा झाल्याचे दिसत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद येथे राष्ट्रवादी आणि काँग्रेसपेक्षा अधिक असली, तरी मनसेची होत असलेली पडझड लक्षात घेता भाजप-सेनेपुढे मनसेचे उमेदवार फारसे आव्हान निर्माण करू शकणार नाहीत, अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे यापुढील काळात आता भाजप-सेनेमध्ये वर्चस्वासाठीचीच लढाई होणार आहे. कोथरूड हा आपलाच बालेकिल्ला आहे, हे दाखविण्यासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून या मतदार संघासाठी व्यूहरचना आणखण्यात येईल, हेही निश्चित आहे. त्यामुळेच आता कोथरूड कोणाचे सेनेचे की भाजपचे हे स्पष्ट होईल. नगरसेविका असताना प्रा. मेधा कुलकर्णी या आमदार झाल्या. त्या अद्यापही नगरसेविका आहेत. आमदार म्हणून त्यांच्याकडे या मतदारसंघाची जबाबदारी असल्यामुळे सेनेच्या उमेदवारांना रोखण्यासाठी त्या काय व्यूहरचना आखणार, कोणाला उमेदवारी देणार हे पाहणेही उत्सुकतेचे ठरणार आहे.
चित्र असे आहे..
- विद्यमान आमदार प्रा. मेधा कुलकर्णी (भाजप)
- आगामी निवडणुकीत निवडून येणाऱ्या नगरसेवकांची संख्या २४
- युती तुटल्यामुळे राजकीय समीकरणे बदलली
- मुख्य लढत भाजप-शिवसेनेमध्येच