पुणे : भारतीय जनता पक्षाचे नवे सत्ताकेंद्र झालेल्या कोथरूड विधानसभा मतदारसंघात भाजप, शिवसेना (ठाकरे) आणि मनसेमध्ये हिंदुत्ववादी मतांची विभागणी होणार असल्याने या मतदारसंघात कोणाला कौल मिळणार, याची उत्सुकता आहे. या मतदारसंघातील तिरंगी लढतीमध्ये ‘मनसे’ची मतेही निर्णायक ठरणार असल्याने शिवसेनेला त्याचा फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र, या परिस्थितीत गेल्या निवडणुकीपेक्षा जास्त मतांनी विजयी होण्याचे आव्हान भाजपपुढे असणार असल्याने त्यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

भारतीय जनता पक्षाचा सुरक्षित मतदारसंघ अशी कोथरूड मतदारसंघाची ओळख आहे. या मतदारसंघात राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शिवसेनेचे (ठाकरे) चंद्रकांत मोकाटे आणि मनसेचे किशोर शिंदे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी असा सरळ सामना या मतदाररसंघात होईल, अशी चर्चा होती. मात्र, मनसेकडून माजी गटनेते किशोर शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे कोथरूडमध्ये तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

controversial statements by bjp union minister
भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या विधानांमुळे वाद; विरोधकांच्या टीकेनंतर सुरेश गोपी यांची सारवासारव
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
delhi assembly elections 2025
लालकिल्ला : दिल्ली भाजपसाठी आणखी प्रतिष्ठेची!
संजय राऊतांच्या विधानाने युतीच्या चर्चेला बळ
Shiv Sena Shinde group strategizes for party growth before upcoming Pune Municipal Corporation elections
पुण्यावर शिंदे गटाचा ‘आवाज’ वाढणार
Raigad Guardian minister post , Aditi Tatkare ,
रायगडच्या पालकमंत्रीपदावरून शिवसेना – राष्ट्रवादीत खडाखडी 
Sanjay Raut on bmc elections
Sanjay Raut : मुंबई पालिकेत ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा, इतर शहरांचं काय? संजय राऊतांनी केलं स्पष्ट; म्हणाले…
Sanjay Shirsat On Uddhav Thackeray :
Sanjay Shirsat : “महिन्याभरात राजकारणाला मोठी कलाटणी मिळेल”, संजय शिरसाटांच्या दाव्याने ठाकरे गटात खळबळ; म्हणाले, “सर्व खासदार…”

हेही वाचा >>>दिवाळीनंतर पुण्यात डेंग्यू, चिकुनगुन्याचा ताप अचानक कमी! जाणून घ्या कारणे

केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यसभा खासदार प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णी हे दोघे याच मतदारसंघातील आहेत. त्यांच्या दिमतीला माजी नगरसेवकांचीही फौज आहे. गेल्या निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांना या मतदारसंघातून २५ हजारांचे मताधिक्य मिळाले होते. मात्र, या सुरक्षित मतदारसंघातून किमान लाखभर मताधिक्य मिळेल, असा त्यांचा अंदाज साफ चुकला होता. गेल्या पाच वर्षांत मात्र परिस्थिती बदलली आहे. भाजपमधील नाराजी दूर झाली आहे. त्यामुळे, आता उलट मताधिक्यासाठी मंत्री आणि खासदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

हेही वाचा >>>पुणे : नाकाबंदी करणाऱ्या पोलिसांना भरधाव दुचाकीची धडक, दुचाकीवरील सहप्रवासी तरुणीसह चौघे जखमी

एके काळी कोथरूड हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता. माजी मंत्री शशिकांत सुतार आणि सध्याचे उमेदवार, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे हे या मतदारसंघातून विजयी झाले होते. सन २०१४ मध्ये भाजपने या मतदारसंघावर ताबा मिळविला. त्यामुळे भाजपकडून हा मतदारसंघ खेचून घेण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील आहे. महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी (शरद पवार) आणि काँग्रेसची कुमक शिवसेनेच्या मदतीला आहे. कोथरूड मतदारसंघात आघाडीमध्ये सध्या वाद नसल्याचे दिसत असले, तरी प्रचारात महाविकास आघाडीचे कार्यकर्ते किती सक्रिय राहणार, यावरच शिवसेनेच्या विजयाची गणिते अवलंबून असतील. काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाची येथे फारशी ताकद नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे शिवसेनेची भिस्त त्यांच्या कार्यकर्त्यांवरच असणार आहे.

मनसेकडून किशोर शिंदे भाजप आणि शिवसेनेला आव्हान देत आहेत. त्यांनी गेली निवडणूकही लढविली होती. त्या वेळी भाजप-शिवसेना युती असल्याने किशोर शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसने पाठिंबा दिला होता. त्यांनी कडवी लढत दिली होती. यंदा मनसे उमेदवार किशोर शिंदे कोणत्या पक्षाची मते घेणार, यावरच उमेदवारांच्या विजयाचे आणि मताधिक्याचे गणित निश्चित होणार आहे.

एकूण मतदार : ४,४०,५५७

पुरुष मतदार : २,२८,७९५

महिला मतदार : २,११,७४०

तृतीयपंथी मतदार : २२

Story img Loader