कोथरूड
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
विनायक करमरकर
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोथरूड मतदारसंघातून लढणार, अशी घोषणा होताच राज्याच्या राजकीय पटलावर कोथरूड मतदारसंघाची एकच चर्चा सुरू झाली. भाजपच्या दृष्टीने राज्यातील ‘सर्वात सुरक्षित’ असलेला कोथरूड मतदारसंघ पाटील यांनी निवडताच आणि स्थानिक उमेदवार विरुद्ध बाहेरचा उमेदवार, ब्राह्मण विरुद्ध मराठा, निष्ठावंतांवर अन्याय, आम्ही ‘नोटा’ वापरणार अशा अनेकविध मुद्दय़ांवर या मतदारसंघात जोरदार वादंग झडले. मात्र दोनच दिवसांत हे वाद शमले. चंद्रकांत पाटील यांना पराभूत करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन या मतदारसंघात एकच उमेदवार दिला असला, तरीही पाटील यांच्यासाठी ही निवडणूक अगदी सोपी ठरली आहे.
कोथरूड हा भाजपचा बालेकिल्ला असून या मतदारसंघातील २३ पैकी १८ नगरसेवक भाजपचे आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत प्रा. मेधा कुलकर्णी या ६४ हजारांच्या मताधिक्याने विजयी झाल्या होत्या आणि लोकसभा निवडणुकीत गिरीश बापट यांना एक लाख सहा हजारांचे मताधिक्य कोथरूडमधून मिळाले होते. भाजपला मानणारा परंपरागत तसेच नवमतदार ही येथील पक्षाची ताकद आहे. पाटील यांची उमेदवारी जाहीर होताच जे वाद निर्माण करण्यात आले, ते अगदीच फुसके ठरले. मुळात, २०१४ मध्ये युती तुटल्यानंतर भाजपने येथून जो मोठा विजय मिळवला, तेव्हाच भाजपची या मतदारसंघातील ताकद सिद्ध झाली होती.
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत ही जागा राष्ट्रवादीकडे गेली होती. मात्र, ही जागा मित्रपक्षाला सोडण्यात येईल, असे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आधीच जाहीर केले होते. राष्ट्रवादीने स्वत:चा उमेदवार उभा न करता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या किशोर शिंदे यांना पाठिंबा दिला. काँग्रेस आघाडी आणि मनसे विरुद्ध महायुती अशी ही लढत असली, तरी पाटील यांच्यापुढे आव्हान उभे राहिलेले नाही.
अशी परिस्थिती असली, तरीही चंद्रकांत पाटील निवडणूक अर्ज भरल्यापासून या मतदारसंघात तळ ठोकून आहेत. सर्व भागात प्रचारफेऱ्या, वाहनफेऱ्या, विविध समाजघटकांचे मेळावे, जाहीर सभा, कोपरा सभा, सोसायटय़ांमध्ये भेटीगाठी, संघशाखांवरील, संघकार्यक्रमांमधील उपस्थिती या आणि अशा सर्व मार्गानी ते स्वत: तसेच त्यांची प्रचार यंत्रणा सक्रिय आहे.
आघाडी आणि मनसेकडून किशोर शिंदे निवडणूक रिंगणात असले, तरी या तिन्ही पक्षांची या मतदारसंघात फारशी ताकद नाही. मनसेचा नगरसेवकही या मतदारसंघात नाही. आघाडीने पाठिंबा दिल्यानंतरही शिंदे यांच्या पाठीशी काँग्रेस आणि राष्ट्रवादी दिसली नाही. त्यामुळे मनसेकडूनच काय तो प्रचार सुरू राहिला.