पुणे : भारतीय जनता पक्षाचे नवे ‘सत्ताकेंद्र’ झालेल्या कोथरूड विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवाराला मिळणारी मते भाजप नेत्यांसाठी प्रतिष्ठेची ठरणार आहेत. या मतदारसंघातील मतटक्का वाढल्याने कोथरूडचे उमेदवार, राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील गेल्या निवडणुकीपेक्षा जास्त मताधिक्य घेणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

शहरातील महत्त्वाचा आणि भारतीय जनता पक्षाचा सुरक्षित मतदारसंघ म्हणून कोथरूड मतदारसंघाची ओळख आहे. कसबा मतदारसंघानंतर भाजपचा हा हक्काचा मतदारसंघ आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांना या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. त्यावेळी त्यांनी लाखाहून जास्त मतांनी निवडून येऊ, असा दावा केला होता. प्रत्यक्षात त्यांना पंचवीस हजारांचे मताधिक्य मिळाले. यावेळी पाटील एक लाखांपेक्षा जास्त मतांनी विजयी होतील, अशी गणिते महायुतीच्या पदाधिकाऱ्यांकडून मांडण्यात येत आहेत. लोकसभा निवडणुकीत केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना या मतदारसंघातून मिळालेले मताधिक्य, खासदार, आमदार आणि नगरसेवकांची फौज तसेच भाजपचा हक्काचा पारंपरिक मतदार असे चित्र या मतदारसंघात असल्याने पाटील यांना लाखांपेक्षा जास्त मतांनी विजयी करण्यासाठीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. लोकसभेतील मताधिक्य टिकविण्याची जबाबदारीही भाजपच्या नेत्यांवर आली आहे.

Khadakwasla constituency, MNS, votes,
‘खडकवासल्या’चा निकाल मनसेच्या हाती
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Prakash Ambedkar on government formation
Vanchit Bahujan Aghadi : निकालाआधीच वंचितचा मोठा निर्णय, पाठिंब्याबाबतची भूमिका जाहीर!
Kenya airport deal cancelled
Kenya cancels Adani Deal: अदाणींना दुसरा झटका; केनियाने विमानतळ, ऊर्जा प्रकल्प केले रद्द, खासदारांनी टाळ्या वाजवून केलं स्वागत
viral video of andhra pradesh
Viral Video : नवजोडप्याला लग्नाचा आहेर देताना मित्राचा करुण अंत; व्हायरल VIDEO मुळे खळबळ!
Pune District Ladki Bahin Yojana, Pune, Ladki Bahin,
मतटक्का वाढण्यास ‘लाडक्या बहिणीं’चा हातभार?
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

हेही वाचा – मतटक्का वाढण्यास ‘लाडक्या बहिणीं’चा हातभार?

गेल्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात ४८.२० टक्के मतदान झाले होते. यावेळी ५२.१८ टक्के मतदान झाले आहे. या मतदारसंघात चंद्रकांत पाटील यांना शिवसेना (ठाकरे) पक्षाचे उमेदवार, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे आणि मनसेचे किशोर शिंदे यांचे आव्हान असणार आहे. गेल्या निवडणुकीत भाजप-शिवसेना युती होती. त्यामुळे पाटील आणि किशोर शिंदे यांच्यात थेट लढत झाली होती. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने शिंदे यांना पाठिंबा दिला होता. यावेळी मनसेमुळे मतांची विभागणी होणार आहे. मनसेचे उमेदवार शिवसेनेची की भाजपची मते घेणार, यावर विजयी उमेदवाराला किती मताधिक्य मिळणार, हे स्पष्ट होणार आहे.

हेही वाचा – ‘खडकवासल्या’चा निकाल मनसेच्या हाती

कोथरूड मतदारसंघात मतटक्का वाढला आहे. हा मतटक्का प्रस्थापितांच्या विरोधात आहे की, भाजपच्या फायद्याचा, याबाबतही उत्सुकता आहे. मात्र, गेल्या निवडणुकीपेक्षा जास्त मताधिक्य घेण्याचे आव्हान पाटील यांच्यापुढे असणार आहे. भाजपची या मतदारसंघातील ताकद लक्षात घेता पाटील यांचे मताधिक्य घटल्यास किंवा ते मर्यादित राहिल्यास भाजपसाठी ती धोक्याची घंटा ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाटील यांच्या मताधिक्याचीच चर्चा या मतदारसंघात आहे.