पुणे : हुंड्यासाठी तरुणीच्या छळ करुन मिरची पावडर मिश्रित पाणी अंगावर ओतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पतीसह नातेवाईकांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पती नागेश कार्तिंक साहेबन्ने (वय २३), रत्ना कार्तिक साहेबन्ने (वय ४२), महादेवी जाधव (वय ५८), लिंबराज भिसे (वय ५८, सर्व रा. कोथरुड) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत एका २२ वर्षीय तरुणीने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हुंड्यासह छळ, गंभीर मारहाण, धमकावणे आदी कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार तरुणी आणि नागेशचा ऑक्टोबर २०२१ मध्ये विवाह झाला होता. विवाहानंतर तिला माहेरहून पैसे आणण्यासाठी त्रास दिला जाऊ लागला. तिला शिवीगाळ करण्यात आली. त्यांनी तरुणीचे हातपाय बांधून पाण्यात मिरची पावडर मिसळली. मिरची पावडर मिश्रित पाणी तिच्या अंगावर टाकले.

The work on six water tanks of Pune Municipal Corporation is still not complete Pune print news
सहा टाक्या, तरी पाणी मिळेना! पुण्यातील प्रकार
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
pune speed breakers
पुण्यातील ‘इतके’ स्पीड ब्रेकर काढणार ? कारण काय
Lamborghini Catches Fire
Lamborghini Fire : मुंबईतील कोस्टल रोडवर ‘लॅम्बोर्गिनी’ला आग; उद्योगपती गौतम सिंघानियांनी Video केला पोस्ट
Thane district water, MIDC, MIDC water scheme ,
ठाणे जिल्ह्याचे पाणी महागणार ? एमआयडीसीची पाणी योजना तोट्यात, दर वाढवण्याच्या हालचाली
khambataki ghat tunnel work loksatta news
खंबाटकी घाटातील नवीन बोगदा अंतिम टप्प्यात, पुणे – बंगळूरू महामार्गाचे दळणवळण होणार गतिमान
Shocking Video Udupi Man Tossed In Air
हवा भरताना अचानक फुटला स्कुल बसचा टायर अन् पुढे….;अंगावर शहारा आणणारा Video Viral
fish die due to polluted water in miraj
मिरजेत प्रदूषित पाण्यामुळे हजारो मासे मृत; मिरजेतील ऐतिहासिक गणेश तलावातील घटना

हेही वाचा >>> पुणे : बलात्काराची तक्रार मागे घेण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षकाची महिलेला धमकी

तिच्या अंगावर मिठाचे पाणी टाकून चुलीत पेटलेल्या लाकडाने चटके दिले. अत्याचार आणि छळामुळे घाबरलेल्या तरुणीने कोथरुड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारदार तरुणीने पोलीस नियंत्रण कक्षात संपर्क साधून सासूकडून मारहाण सुरू असल्याची तक्रार केली होती. या घटनेची माहिती मिळताच कोथरुड पोलीस घटनास्थळी पोहोचले. तिला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले, असे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक दिगंबर कोकाटे यांनी सांगितले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.

Story img Loader