पुणे: एनडीए रस्त्यावर कोयता गँगने दहशत माजविल्याची घटना घडली. उपहारगृहात काम करणाऱ्या दोन कामगारांना टोळक्याने मारहाण केली. याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी तिघांना अटक केली. प्रसन्न उर्फ बाळा मनोज कदम (वय २३, रा. शांतीबन सोसायटी, शिवणे), आदित्य उद्धव पांचाळ (वय १९, रा. राहुलनगर, शिवणे), सनी रामप्रताप गुप्ता (वय २१, रा. समर्थ आंगण सोसायटी, शिवणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत अमर राजेंद्र घारे (रा. स्वरा हाईट्स, अहिरे गाव, वारजे) यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

घारे यांचे उपहारगृह आहे. त्यांच्या उपहारगृहातील कामगार रुपेश आणि रमेश दुचाकीवरुन एनडीए रस्त्याने निघाले होते. शिवणे परिसरात आरोपी कदम, पांचाळ आणि गुप्ता यांनी दोघांना अडवले आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. मी या भागातील दादा आहे. बाजूला चल मी तुला दाखवितो, अशी धमकी कदमने दोघांना दिली. कदमने त्याच्याकडील कोयता उगारुन मारहाण करण्यास सुरुवात केली.

हेही वाचा… हडपसर भागतील मांजरीत गोदामास आग

कदम, पांचाळ, गुप्ता यांनी कोयता उगारुन मध्यस्थी करणाऱ्या नागरिकांना शिवीगाळ केली. आम्हाला अडवायचे नाही, अशी धमकी दिली. कोयते उगारुन दहशत माजविली. या घटनेची माहिती मिळताच उत्तमनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पसार झालेल्या आरोपींना अटक केली. सहायक पोलीस निरीक्षक पवार तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Koyta gang beat two workers working in the restaurant on nda road in pune print news rbk 25 dvr