पुणे : गुलटेकडीतील ओैद्योगिक वसाहतीत दहशत माजविणाऱ्या कोयता गँगचा म्होरक्या सचिन माने याला स्वारगेट पोलिसांच्या पथकाने पकडले. माने याच्यासह नऊ साथीदारांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून काेयते, तलवार, पालघन असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी सचिन परशुराम माने (वय २४), रोहित मधुकर जाधव (वय २७), अजय प्रमोद डिखळे (वय २४), यश किसन माने (वय १८), रोहित मधुकर जाधव (वय २७), अमर तानाजी जाधव (वय ३२), विजय प्रमोद डिखळे (वय १८), मोन्या उर्फ सूरज सतीश काकडे (वय २६, सर्व रा. औद्योगिक वसाहत, गुलटेकडी), निखील राकेश पेटकर (वय २२, रा. आईमाता मंदिराजवळ, बिबवेवाडी) यांना अटक करण्यात आली आहे. अटक आरोपी आणि त्यांचे साथीदार पल्या पासंगे (वय २१), आयुष किसन माने (वय २१ दोघे रा. गुलटेकडी), माया उर्फ अभिषेक पाटोळे (वय २२) प्रमोद उर्फ पम्या (दोघे रा. जनता वसाहत, पर्वती पायथा) आणि एका अल्पवयीन मुलाच्या विरुद्ध मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

terror of gangster Mangalwar Peth , Mangalwar Peth,
पुणे : तडीपार गुंडाची कोयते उगारून दहशत, मंगळवार पेठेतील घटना
Aries To Pisces 6th November Horoscope
६ नोव्हेंबर पंचांग: चारचौघात कौतुक, अचानक धनलाभ, जन्मराशीनुसार…
BJP worker Murder, Lonavla rural police,
हातऊसने दिलेल्या पैशांच्या वादातून भाजप कार्यकर्त्याचा खून, लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून मित्रासह तिघे गजाआड
terror among the villagers after tiger kills man in melghat
मेळघाटात वाघाच्‍या हल्‍ल्‍यात एकाचा मृत्‍यू ; गावकऱ्यांमध्‍ये दहशत
navi Mumbai car hit six people
नवी मुंबई: मित्राच्या स्कुटीला धडक मारल्याचा राग आल्याने सरळ पाच – सहा जणांच्या अंगावर घातली गाडी
BJP worker was stoned to death in Pavananagar in Maval
मावळातील पवनानगरमध्ये भाजप कार्यकर्त्याचा दगडाने ठेचून खून
eknath shinde
राज्यात पुन्हा संधी मिळाली तर, आणखी योजना राबवेन; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
girl abducted and gang tortured Amravti news
अमरावतीत तरूणीचे अपहरण करून सामूहिक अत्‍याचार…

हेही वाचा >>> शिवाजीनगर एसटी स्थानक मूळ जागीच ; दादा भुसे यांची विधानसभेत ग्वाही

गुलटेकडी ओैद्योगिक वसाहतीतील (मीनाताई ठाकरे वसाहत) वर्चस्वाच्या वादातून सचिन माने आणि साथीदारांनी प्रतिस्पर्धी टोळीतील प्रकाश पवार आणि साथीदारांवर कोयत्याने वार केले होते. माने आणि साथीदारांनी कोयते उगारुन परिसरात दहशत माजविली होती. तोडफोड करुन आरोपी माने साथीदारांसह पसार झाला होता. पसार झालेला माने घोरपडे पेठेत मैत्रिणीला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. पोलिसांनी सापळा लावुन मानेला पकडण्याचा प्रयत्न केला. त्याने पोलिसांवर कोयता उगारला. झटापटीत पोलीस कर्मचारी शिवा गायकवाड जखमी झाले.

हेही वाचा >>> पोलीस ठाण्यातच तक्रारदाराच्या गळ्यावर ब्लेडने वार

पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सोमनाथ गायकवाड, सहायक निरीक्षक प्रशांत संदे, उपनिरीक्षक अशोक येवले, मुकुंद तारु, शिवा गायकवाड, अनिस शेख, दीपक खेंदाड, सुजय पवार, सोमनाथ कांबळे, फिरोज शेख, रमेश चव्हाण यांनी ही कारवाई केली. माने याने ओैद्योगिक वसाहतीत एसएम कंपनी नावाने गुन्हेगारी टोळी सुरु केली होती. त्याच्या विरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, खंडणी असे गंभीर गुन्हे स्वारगेट, सहकारनगर, मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. त्याच्या विरुद्ध झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्यात आली होती. त्याला वर्षभरासाठी येरवडा पोलीस ठाण्यात स्थानबद्ध करण्यात आले होते.