पिंपरी-चिंचवडमधील चिखली परिसरात कोयता गॅंगने हैदोस घातला आहे. कोयता गॅंगच्या अल्पवयीन टोळीने दोघांवर कोयत्याने वार करत दिसेल त्या महिलेचे सोन्याचे दागिने लुटले. त्याचबरोबर दुचाकीवरून येणाऱ्या वाहन चालकांचे मोबाईलदेखील हिसकावून पळ काढल्याची घटना चिखली परिसरात घडली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याप्रकरणी चिखली पोलिसांनी पाच अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. गेल्या काही दिवसांपासून चिखली परिसरात अशा घटना घडत आहेत. त्यामुळे पोलिसांनी आरोपींना अद्दल घडवण्याची गरज आहे.

हेही वाचा – सायबर गुन्हेगाराकडून काँग्रेस नेत्याची फसवणूक; पोलिस निरीक्षकाच्या नावाने फेसबूकवर बनावट खाते

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन पाच मुलांच्या टोळीने चिखली परिसरात दहशत पसरविण्यासाठी मध्यरात्री दोघांवर कोयत्याने वार केले. महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावले. त्याचबरोबर रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन चालकांना थांबून कोयत्याचा धाक दाखवत त्यांच्याकडील मोबाईल काढून घेतले. हा सर्व प्रकार दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री घडला आहे. या प्रकरणाचा एक व्हिडीओ समोर आला असून कोयता गॅंगच्या अल्पवयीन मुलांचा हैदोस सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

हेही वाचा – वर्धा : भाजपाच्या नगराध्यक्षांच्या कामाची बोंब अन् आता दुरुस्ती करणार भाजपाचेच आमदार!

याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांच्या पथकाने अवघ्या काही तासांतच अल्पवयीन पाच मुलांना ताब्यात घेतले आहे. अशा प्रकारच्या गुन्हेगारीमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग जास्त असल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Koyta gang of minor children in pimpri attack on 2 people looted jewellery kjp 91 ssb
Show comments