पुणे : सध्याच्या काळात महात्मा गांधींच्या अहिंसेच्या मार्गावर चालण्याची आवश्यकता आहे. प्रत्यक्षात वेगळेच चित्र दिसते. पुण्यात कोयता गँगची मोठी दहशत आहे, असे मी ऐकले. दहशत पसरवणे हे लोकशाहीला घातक आहे. त्यामुळे या कोयता गँगला ठोकून काढा, असे मी पोलिसांना सांगणार आहे, असे उद्योगमंत्री उदय सामंत रविवारी म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जितो) पुणे विभागाच्या वतीने रविवारी पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी मंत्री सामंत बोलत होते. या कार्यक्रमात जीवनगौरव पुरस्कार मिलिंद फडे यांना देण्यात आला. यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ एस.के. जैन, जितोचे अध्यक्ष राजेशकुमार सांकला, उपाध्यक्ष विजय भंडारी आदी उपस्थित होते.

हेही वाचा >>> पुणे : रिक्षाचालकाला दमदाटी करुन रिक्षा चोरली, भवानी पेठेतील घटना

सामंत म्हणाले की, सध्याच्या काळात एकत्र येऊन निर्णय घेणे आवश्यक आहे. राजकारणात दिवसेंदिवस हुकूमशाही वाढत आहे. राजकीय पक्षात लोकशाही असती, तर आम्हाला गुवाहाटीला जावे लागले नसते. तुम्ही एखाद्याला मान देता, तेव्हा तो तुम्हाला त्याची मान देतो. मात्र, तुम्ही मान दिला नाही, तरी तो माणूसही कधीतरी मोठा होतो. त्यावेळची स्थिती खूप वेगळी असते आणि त्याचे पडसादही खूप वेगळे असतात. सर्वांनाच ते राज्याच्या राजकारणात पाहायला मिळाले. 

संजय राऊत यांच्यावर निशाणा

जैन समाजातील चार संघटना एकत्र येऊन चांगले काम करीत आहेत. राजकारणात असे घडत नाही आणि त्याचे परिणामही आपल्याला समोर दिसतात. सकाळी उठून टिव्ही लावला की, शिवीगाळ करायचा शो लागतो, अशी टीका सामंत यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Koyta gang spread terror arrest them industries minister uday samant advises pune police pune print news stj 05 ysh
Show comments