पुणे: हडपसर भागातील वैदुवाडी परिसरात कोयता गँगने दहशत माजविल्याची घटना घडली. टोळक्याने एका तरुणावर वार केले. याप्रकरणी सात अल्पवयीन मुलांसह साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिलिंद मधुकर कांबळे (वय २३, रा. हडपसर) याने फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार सात अल्पवयीन मुलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी आदित्य राम खैरे (वय १९, रा. हडपसर) याला अटक करण्यात आली आहे.

Baba Siddiqui murder case Arrest of accused financial helper Mumbai
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण: आरोपींना आर्थिक मदत करणाऱ्याला अटक
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Eknath Shinde On Heena Gavit :
Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदेंचा हिना गावितांना अप्रत्यक्ष इशारा; म्हणाले, “बंडखोरी…”
Baba Siddique murder case
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण : आकाशदीप गिलला पंजाबमधून अटक
Accused who escaped after killing friend arrested
मित्राचा खून करून पसार झालेला आरोपी गजाआड, ससून रुग्णालय परिसरात कारवाई
Koyta-carrying gangster arrested, gangster Tadipar,
पुणे : कोयता बाळगणाऱ्या तडीपार गुंडाला पकडले
Bangladesh citizens Ratnagiri, Anti-Terrorism Squad,
रत्नागिरीत तेरा बांगलादेशी घुसखोरांना पकडले, दहशतवाद विरोधी पथकाची मोठी कारवाई
salman khan lawrence bishnoi
पुन्हा धमकी, पुन्हा बिश्नोई गँग; सलमान खानच्या नावाने मुंबई पोलिसांना आला संदेश!

हेही वाचा… पुणे : मोटारचालकाची मुजोरी; पीएमपी चालकाला मारहाण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिलिंद कांबळे, त्याचे मित्र विकी गायकवाड, शुभम चाबुकस्वार हे म्हाडा काॅलनी परिसरात गप्पा मारत होते. त्यावेळी अल्पवयीन मुलाने विकी गायकवाडशी झालेल्या भांडणातून वाद घालण्यास सुरुवात केली. अल्पवयीन मुलगा आणि साथीदारांनी मिलिंद कांबळे याच्यावर कोयत्याने वार केले. त्यानंतर त्यांनी कोयते उगारून दहशत माजविली. पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करत आहेत.