पुणे : कोयगा गँगने पुन्हा दहशत माजविल्याची घटना लोहगाव भागात सोमवारी मध्यरात्री घडली. अल्पवयीन मुले, तसेच साथीदारांनी २९ वाहनांची तोडफोड केली. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकाला अटक करण्यात आली आहे. हशिम खलील शेख (वय १८, रा.  कलवडवस्ती, लोहगाव) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेेण्यात आले आहे.  याबाबत इनायतअली शौकतअली अन्सारी (वय २७, रा. लोहगाव) याने  फिर्याद दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अन्सारी कलवडवस्ती भागात राहायला आहे.  सोमवारी मध्यरात्री तिघे जण दुचाकीवरून कलवड वस्ती भागात आले. त्यांनी कोयते उगारुन रस्त्यावर लावलेल्या वाहनांची तोडफोड करण्यास सुरवात केली.  टोळक्याने कलवड वस्ती, खेसे पार्क, पानसरे वस्ती परिसरात वाहनांची तोडफोड केली. मोटार, रिक्षा, दुचाकी अशा २९ वाहनांची तोडफोड केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास करुन शेखला अटक केली. त्याच्याबरोबर असलेल्या अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले.