पुणे : कात्रज भागात कोयता गँगने दहशत माजवून एका तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना घडली. या प्रकरणी तीन अल्पवयीन मुलांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
विशाल विठ्ठल धुळे (वय १८, रा. जय शंकर अपार्टमेंट, कात्रज) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. त्याने याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी तीन अल्पवयीन मुलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तीन मुलांचे वय १५ वर्षे आहे. अल्पवयीन मुलांचा विशाल याच्याशी वाद झाला होता. तो कात्रज भागातील किनारा हाॅटेल परिसरातून निघाला होता. त्या वेळी तिघांनी त्याला अडवून त्याच्यावर कोयत्याने वार केले.
हेही वाचा – ‘आर्थिक पातळीवरील असमानता अस्मितांच्या संघर्षांचे कारण’
हेही वाचा – पोषण आहाराचे धान्य निकृष्ट आढळल्यास कारवाई; भरारी पथकांमार्फत धान्याची तपासणी बंधनकारक
विशाल गंभीर जखमी झाला. पसार झालेल्या अल्पवयीन मुलांचा शाेध घेण्यात येत असून पोलीस उपनिरीक्षक अतुल थोरात तपास करत आहेत.