ससून रुग्णालयाच्या आवारात हडपसर भागातील गुन्हेगारी टोळ्यांमधील सराईत गुन्हेगारांचा वाद झाला. सराईतांनी एकमेकांवर कोयते उगारुन दहशत माजविली. या घटनेनंतर रुग्णालयाच्या आवारात घबराट उडाली.

हेही वाचा >>>कसबा पोटनिवडणूकीत चर्चेत असलेल्या ‘पुण्येश्वर मंदिर’चा नेमका इतिहास काय आहे?

ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
6 feet long snake entered the MIDC police station
पोलीस ठाण्यात साप आणि पोलिसांची तारांबळ
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
BJP Party Worker Dead Body Found in Office
BJP Worker : भाजपा कार्यकर्त्याचा रक्ताने माखलेला मृतदेह कार्यालयात सापडल्याने खळबळ, महिला अटकेत; कुठे घडली घटना?
bombay hc reject builder bail over illegal housing projects
बेकायदा गृहप्रकल्प राबवणाऱ्यांवर कारवाई गरजेची; विकासकांना जामीन नाकारताना उच्च न्यायालयाची टिप्पणी
vip roads for ordinary pune residents
लोकजागर : सामान्य पुणेकरांना ‘व्हीआयपी’ रस्ते मिळतील का?
Attempted murder of laborer due to argument over drinking
दारू पिताना झालेल्या वादातून मजुराचा खुनाचा प्रयत्न, भिडे पूल परिसरातील घटना

हडपसरमधील रामटेकडी परिसरातील सराईतांच्या दोन टोळ्यांमध्ये शुक्रवारी दुपारी वाद झाला. त्यानंतर दोन्ही टोळ्यांमधील सराईत हडपसर पोलीस ठाण्यात गेले. पोलिसांनी कारवाई केली. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठी दुपारी ससून रुग्णालयात नेण्यात आले. त्या वेळी हडपसर पोलीस ठाण्यातील तपास पथकातील कर्मचारी त्यांच्या बरोबर होते. रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण उपचार कक्षाच्या (ओपीडी) दोन टोळ्यांमधील सराइत समोरासमोर आले. सराइतांच्या साथीदारांनी एकमेकांना शिवीगाळ करुन कोयते उगारुन दहशत माजविली.

हेही वाचा >>>Kasba Assembly ByElection : “आमच्यावर कृष्णाकाठी प्रायश्चित करण्याची वेळ…” मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कसब्यातून अजितदादांना टोला

ससून रुग्णालयाच्या आवारातील सुरक्षारक्षक आणि हडपसर पोलिसांच्या पथकाने सराईतांना रोखण्याचा प्रयत्न केला. हाणामारीत तीन ते चार जण जखमी झाले. पोलिसांनी या प्रकरणात दोन टोळ्यांमधील सराईतांना ताब्यात घेतले. त्यांच्या विरुद्ध स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती हडपसर पोलिसांनी दिली.

दरम्यान, सहा महिन्यांपूर्वी ससून रुग्णालयात येरवडा कारागृहातून उपचारासाठी दाखल झालेल्या हिंदू राष्ट्र सेनेचा कार्यकर्ता तुषार हंबीर याच्यावर हल्ला झाला होता.