लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: शिवाजीनगरहून संगमवाडी रस्त्यावर गुंडांच्या टोळक्याने दहशत माजविल्याची घटना घडली. कोयते उगारुन दहशत माजविण्यात काही स्थानिक तरुण सामील असल्याने भयभीत झालेल्या नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार केली नाही. दरम्यान, या घटनेची गंभीर दखल पोलिसांनी घेतली असून दहशत माजविणाऱ्या तरुणांचा शोध घेण्यात येत आहे.
येरवड्यातील संगमवाडी परिसरात तरुणांच्या दोनगटात वाद झाल्याने हाणामारी झाली. एका गटाने साथीदारांना बोलावून घेतले. दुचाकीवरुन आलेल्या टोळक्याने बिअरच्या बाटल्या रस्त्यात फोडल्या तसेच कोयते उगारुन दहशत माजविली. काही स्थानिक नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र, टोळक्याने नागरिकांना धमकावले.
हेही वाचा… पुणे: ‘एलबीटी’प्रकरणातून मिळणाऱ्या कोट्यवधींच्या महसुलाकडे महापालिकेचे सात वर्षांपासून दुर्लक्ष
या घटनेचे चित्रीकरण परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केले. सीसीटीव्ही चित्रीकरण समाजमाध्यमात प्रसारित झाल्यानंतर पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली. दहशत माजविण्यात काही स्थानिक तरुण सामील असल्याने पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. सामोपचाराने हाणामारीचे प्रकरण मिटवण्यात आल्याची माहिती रहिवाशांनी दिली.