पुणे: येरवड्यात मध्यरात्री टोळक्याने दहशत माजवली. टोळक्याने ३० ते ३५ वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली. येरवड्यातील लक्ष्मी नगर भागात मध्यरात्री टोळके आले. त्यांच्याकडे कोयते होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टोळक्याने लक्ष्मी नगर भागातील वाहनांची तोडफोड करण्यास सुरुवात केली. विरोध करणाऱ्या नागरिकांना शिवीगाळ करून त्यांच्यावर कोणते उभारले. या घटनेमुळे नागरिक भयभीत झाले. टोळक्याने ३० ते ३५ वाहनांची तोडफोड केली. या घटनेची माहिती मिळतात पोलिसांनी धाव घेतली. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा… येरवड्यात भररस्त्यात एकाने पेटवून घेतले; गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या बंदोबस्तातील पोलीस मदतीसाठी धावले

शहरात गेल्या काही महिन्यांपासून दहशत माजवण्याचे प्रकार सुरू आहेत. वर्चस्वाच्या वादातून गुंड प्रवृत्तीचे तरुण नागरिकांच्या वाहनांची तोडफोड करत असल्याचे दिसून आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Koyta gang vandalized 30 to 35 vehicles in the midnight in lakshmi nagar area of yerwada pune print news rbk 25 dvr