पुणे : दहशत माजविण्यासाठी टाेळक्याने कोयते, दांडकी उगारून वाहनांची तोडफोड केल्याची घटना कोंढव्यातील गोकुळनगर परिसरात घडली. या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
याबाबत जीतमल शर्मा (वय ४०) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शर्मा कोंढव्यातील गोकुळनगर भागात राहायला आहेत. मध्यरात्री दुचाकीवरून आलेल्या चार ते पाच जणांनी शर्मा यांच्या मोटारीची दांडक्याने तोडफोड केली. आम्ही भाई आहोत. घरात गप्प बसा, अशी धमकी देऊन टोळक्याने श्रवणदास वैष्णव यांच्या मोटारीची ताेडफोड केली. टोळक्याने कोयते उगारून दहशत माजविली. टोळक्याने एक रिक्षा, तसेच मोटारींची तोडफोड केली. पसार झालेल्या टोळक्याचा शोध घेण्यात येत असून सहायक पोलीस निरीक्षक भाबड तपास करत आहेत.
First published on: 10-01-2023 at 15:28 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Koyta gang vandalized five vehicles in kondhwa pune pune print news rbk 25 ssb