पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने प्रसिद्ध चित्रकार साधना बहुळकर यांनी लिहिलेल्या ‘बॉम्बे स्कूल’ परंपरेतील स्त्री चित्रकार’ या पुस्तकास नलिनी गुजराथी पुरस्कृत कृष्ण मुकुंद उजळंबकर स्मृती पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. राजहंस प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.
हेही वाचा >>> ‘भारत विद्या’ ऑनलाइन शैक्षणिक व्यासपीठाचे उद्या निर्मला सीतारामन यांच्या हस्ते अनावरण
ज्ञान प्रबोधिनी संस्थेच्या प्रबोध सभागृहामध्ये शनिवारी (२४ सप्टेंबर) सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या कार्यक्रमात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते बहुळकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार या वेळी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती परिषदेचे कार्यवाह बंडा जोशी यांनी दिली.