पुणे : विश्वकोश निर्मिती मंडळाच्या वतीने १४ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांना डोळ्यांसमोर ठेवून प्रकाशित करण्यात येत असलेल्या कुमार कोशाच्या तीन आणि चार अशा दोन भागांतील नोंदी संकेतस्थळावर प्रसारित करण्यात आल्या आहेत. हे दोन्ही भाग मुद्रित स्वरूपात लवकरच वाचकांच्या भेटीला येणार आहेत. कुमार कोशाचे दोन भाग यापूर्वीच म्हणजे २०११ आणि २०१४ मध्ये प्रकाशित झाले असून, आता ‘अंकुरण ते ज्ञानेंद्रिये’ अशा चारही भागांच्या मिळून १ हजार २५ नोंदी संकेतस्थळावर पाहता येतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विश्वकोश निर्मिती मंडळाने कुमारवयीन मुलांसाठी कुमार कोश निर्मितीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या कालखंडात घेतला होता. मूळ बारा खंडांचा असलेल्या कुमार कोश प्रकल्पातील पहिला खंड हा ‘जीवसृष्टी आणि पर्यावरण’ विषयाला वाहिलेला आहे. या खंडाचे दोन भाग यापूर्वीच म्हणजे २०११ आणि २०१४ मध्ये प्रकाशित झाले आहेत. तिसऱ्या भागाच्या नोंदी यापूर्वी संकेतस्थळावर प्रसारित झालेल्या आहेत.

हेही वाचा : पावसाचे पुनरागमन… पुणे, पिंपरी- चिंचवडमध्ये जोरदार पाऊस

आता तो भाग परिपूर्ण स्वरूपात संपादित झाला असून, चारही भाग परिपूर्ण स्वरूपात झाले आहेत. याचे ई-लोकार्पण या महिन्यात होणे अपेक्षित आहे. त्यानंतर काही कालावधीने भाग तीन आणि चार ग्रंथरूपात प्रकाशित करण्यात येणार आहेत, अशी माहिती विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डाॅ. राजा दीक्षित यांनी दिली.

हेही वाचा : मंडपासाठी ४० फूट उंचीची मर्यादा…गणेश मंडळांसाठी महापालिकेने केली ‘ही’ नियमावली

कुमार कोशाच्या तिसऱ्या भागातील नोंदी २०१९ मध्ये संकेतस्थळावर प्रसारित करण्यात आल्या होत्या. या नोंदीमध्ये काही भर घालण्यात आली असून, काही नोंदींची दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यासाठी टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राचे माजी संचालक डाॅ. हेमचंद्र प्रधान यांचे सहकार्य लाभले आहे. कुमार कोशाच्या या चार भागांच्या रूपाने पहिल्या खंडाचे काम पूर्णत्वास जाईल. त्यानंतर लगेच दुसऱ्या खंडाचे काम हाती घेण्यात येणार आहे, असे डाॅ. दीक्षित यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kumar kosh entries released on website print form for readers published soon pune print news vvk 10 css
Show comments