पुणे पुस्तक महोत्सव १६ डिसेंबरपासून…

पुणे : राष्ट्रीय पुस्तक न्यासातर्फे १६ ते २४ डिसेंबर दरम्यान आयोजित पुणे पुस्तक महोत्सवात विविध भाषांतील पुस्तकांची दोनशे दालने समाविष्ट असणार आहेत. तसेच महोत्सवात मुलांसाठीच्या कार्यक्रमांपासून राजकीय नेत्यांच्या वाचनापर्यंतच्या वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची रेलचेल असून, हिंदी कवी डॉ. कुमार विश्वास, लेखक विक्रम संपत, डॉ. रघुनाथ माशेलकर असे अनेक मान्यवर महोत्सवात सहभागी होणार आहेत.

हेही वाचा >>> सीबीएसईकडून दहावी, बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

Loksatta lokrang Birth centenary year of Dr Wankhade pioneer of Dalit literary movement
दलित साहित्य चळवळीचे प्रवर्तक
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
eradication of caste book review
बुकमार्क : जातीय जनगणना की जातिव्यवस्थेचे निर्मूलन?
author samantha harvey wins the booker prize 2024 with orbital novel
समांथा हार्वे यांच्या ‘ऑर्बिटल’ला बुकर ; अंतराळावरील कादंबरीचा पहिल्यांदाच सन्मान
nehru literature soon in one click available on digital form on mobile
नेहरूंचे साहित्य लवकरच एका क्लिकवर!
Book Self discovery in space Science
बुकरायण: अंतराळातला आत्मशोध
Best American Short Stories O Henry Prize Stories author book
बुकबातमी: कथेतला ‘तृतीयपुरुष’ हरवला आहे?
Scholarship creative leadership Disom Foundation career news
स्कॉलरशिप फेलोशिप: सर्जनशील कृतिशील नेतृत्व घडविणारी डिसोम फेलोशिप

पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल, मंदार जोशी, आनंद काटीकर, राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या कांचन शर्मा या वेळी उपस्थित होते. पुणे पुस्तक महोत्सवाच्या आयोजनात अनेक संस्थांचा सहभाग आहे. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर हा महोत्सव होणार आहे. महोत्सवाचे उद्घाटन १६ डिसेंबर आणि समारोप २४ डिसेंबरला होणार आहे. महोत्सवातील कार्यक्रमांमध्ये गायक नंदेश उमप यांचा लोकरंग हा सांस्कृतिक कार्यक्रम, डॉ. माधवी वैद्य यांचा सुट्टी आली, सुट्टी आली हा कार्यक्रम, तुकाराम दर्शन हे महानाट्य, हिंदी कवी डॉ. कुमार विश्वास यांचे व्याख्यान, पत्रकार सौरभ द्विवेदी यांच्याशी संवाद, लेखक विक्रम संपत यांचे व्याख्यान, ५८ स्वातंत्र्य सैनिकांवरील कारागृहातील कल्लोळ हा कार्यक्रम, लष्कराच्या बँडचे सादरीकरण, अविनाश धर्माधिकारी, सदानंद दाते, विश्वास पाटील यांचा सहभाग असलेला आमचा वाचन कारभार हा चर्चात्मक कार्यक्रम, फैजल हा काश्मिरी गीतांचा कार्यक्रम, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांची मुलाखत, शिवराज्याभिषेकावर आधारित श्रीमंत योगी हे महानाट्य, डॉ. सोनल कुलकर्णी यांचा मराठीच्या बोलींचे प्रतिमांकन, ॲड. आशिष शेलार, सतेज पाटील, डॉ. नीलम गोऱ्हे, सिद्धार्थ शिरोळे यांचा सहभाग असलेला राजकीय नेते काय वाचतात हा चर्चात्मक कार्यक्रम अशा कार्यक्रमांचा समावेश आहे. पांडे म्हणाले, की दिल्लीतील प्रगती मैदानावर होणाऱ्या पुस्तक महोत्सवानंतरचा हा मोठा पुस्तक महोत्सव महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात होणार आहे. त्यामुळे पुस्तकांसह वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची मेजवानी पुणेकरांना मिळणार आहे.