पुणे : ‘खारीच्या वाटा’ ही ज्येष्ठ बालसाहित्यकार ल. म. कडू यांची साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यकृती आता हिंदी आणि इंग्रजीसह दहा भाषांमध्ये जात आहे. पाच वर्षांपूर्वी बालसाहित्याचा पुरस्कार प्राप्त झालेल्या या साहित्यकृतीचा अनुवाद साहित्य अकादमीच्या वतीने करण्यात येत आहे.

‘खारीच्या वाटा’ ही साहित्यकृती हिंदी आणि इंग्रजीसह अन्य प्रादेशिक भाषांमध्ये अनुवादित करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी विनंती करणारे पत्र साहित्य अकादमीकडून कडू यांना आले आहे. ‘खारीच्या वाटा’ ही बालकादंबरी डोगरी, कोकणी, मैथिली, मणिपुरी, नेपाळी, राजस्थानी, बोडो आणि संताली या भाषांमध्ये अनुवादित करण्यात येणार असल्याचे साहित्य अकादमीचे  सहायक संपादक अजय कुमार शर्मा यांनी कडू यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.

Mithun Chakraborty in Disco Dancer. (Express Archive Photo)
मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार; जिमीने बॉलिवूडमध्ये डिस्कोची लाट कशी आणली?
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Dadasaheb Phalke Award
Dadasaheb Phalke Award : दादासाहेब फाळके पुरस्काराची परंपरा कधी सुरु झाली? काय असतं पुरस्काराचं स्वरुप? कोण कोण आहेत मानकरी?
Mithun Chakraborty Dadasaheb Phalke Award News in Marathi
Mithun Chakraborty Dadasaheb Phalke Award : मिथुन चक्रवर्तींना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर, सिनेसृष्टीतील योगदानाबाबत गौरव
Book Booker Prize Introduction to novels Article
बुकरायण: बुकसुखी आणि इतर
one leader one election in name of nation whatever is going on today is not a nation
नागपूर : “एक नेता, एक निवडणूक म्हणजे राष्ट्रहित नव्हे,” साहित्यिक-समीक्षकांचे मत
dispute on vasant kanetkar literature copyright
प्रा. वसंत कानेटकर लिखित अप्रकाशित संहितेच्या हक्कावरुन वाद
Raj Thackeray, emblem, Marathi Sahitya Samelan,
साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाची राज ठाकरे यांच्याकडून होणार निवड

एका निसर्गरम्य खेडय़ातील किशोरवयीन मुलाने पाळलेली खार. गावाच्या नदीवर धरण बांधण्यासाठी आलेल्या यंत्रांची घरघर आणि या विकासामध्ये थोडय़ाच दिवसांत मुलगा कुटुंबासह गाव सोडतो. ती खार मात्र तिथेच राहते. उमलत्या हळव्या वयातल्या उलथापालथीची सहजपणे सांगितलेली खरी गोष्ट ल. म. कडू यांनी या कादंबरीतून हळुवारपणे उलगडली आहे. राजहंस प्रकाशनने प्रकाशित केलेल्या या साहित्यकृतीला २०१७ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता.

आपल्या साहित्यकृतीचा दहा भाषांमध्ये अनुवाद होतो याचा आनंद आहे. असे काही होईल हे मनातही नव्हते. पण, हा अनुवाद करावा असे वाटले याचा अर्थ काही तरी त्या साहित्यकृतीमध्ये आहे. ‘खारीच्या वाटा’ पुस्तक लेखनाच्या माध्यमातून बालसाहित्यामध्ये मी खारीचा वाटा उचलू शकलो याचा आनंद नक्कीच आहे.                                                            ल. म. कडू, ज्येष्ठ बालसाहित्यकार