पुणे : ‘खारीच्या वाटा’ ही ज्येष्ठ बालसाहित्यकार ल. म. कडू यांची साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यकृती आता हिंदी आणि इंग्रजीसह दहा भाषांमध्ये जात आहे. पाच वर्षांपूर्वी बालसाहित्याचा पुरस्कार प्राप्त झालेल्या या साहित्यकृतीचा अनुवाद साहित्य अकादमीच्या वतीने करण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘खारीच्या वाटा’ ही साहित्यकृती हिंदी आणि इंग्रजीसह अन्य प्रादेशिक भाषांमध्ये अनुवादित करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी विनंती करणारे पत्र साहित्य अकादमीकडून कडू यांना आले आहे. ‘खारीच्या वाटा’ ही बालकादंबरी डोगरी, कोकणी, मैथिली, मणिपुरी, नेपाळी, राजस्थानी, बोडो आणि संताली या भाषांमध्ये अनुवादित करण्यात येणार असल्याचे साहित्य अकादमीचे  सहायक संपादक अजय कुमार शर्मा यांनी कडू यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.

एका निसर्गरम्य खेडय़ातील किशोरवयीन मुलाने पाळलेली खार. गावाच्या नदीवर धरण बांधण्यासाठी आलेल्या यंत्रांची घरघर आणि या विकासामध्ये थोडय़ाच दिवसांत मुलगा कुटुंबासह गाव सोडतो. ती खार मात्र तिथेच राहते. उमलत्या हळव्या वयातल्या उलथापालथीची सहजपणे सांगितलेली खरी गोष्ट ल. म. कडू यांनी या कादंबरीतून हळुवारपणे उलगडली आहे. राजहंस प्रकाशनने प्रकाशित केलेल्या या साहित्यकृतीला २०१७ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता.

आपल्या साहित्यकृतीचा दहा भाषांमध्ये अनुवाद होतो याचा आनंद आहे. असे काही होईल हे मनातही नव्हते. पण, हा अनुवाद करावा असे वाटले याचा अर्थ काही तरी त्या साहित्यकृतीमध्ये आहे. ‘खारीच्या वाटा’ पुस्तक लेखनाच्या माध्यमातून बालसाहित्यामध्ये मी खारीचा वाटा उचलू शकलो याचा आनंद नक्कीच आहे.                                                            ल. म. कडू, ज्येष्ठ बालसाहित्यकार

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: L m kadu book kharichya vata available in ten languages including hindi and english zws
Show comments