पुणे : कोथरूडमधील गुरूगणेशनगर परिसरात नियोजित गृहप्रकल्पाच्या चौथ्या मजल्यावरुन एका मजुराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. संजय हरिभाऊ वाळंज (वय ४८, रा. किष्किंदानगर, कोथरूड ) असे मृत्युमुखी पडलेल्या मजुराचे नाव आहे. या प्रकरणी बांधकाम व्यावसायिकासह ठेकेदारांच्या विरुद्ध कोथरुड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत वाळंज यांची पत्नी सारिका (वय ४०) यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोथरुडमधील गुरुगणेशनगर परिसरात नियोजित गृहप्रकल्पाचे काम सुरू आहे. नियोजित गृहप्रकल्पातील चौथ्या मजल्यावर वाळंज काम करत होते. त्या वेळी चवथ्या मजल्यावरुन पडून वाळंज गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. बांधकाम व्यावसायिक तसेच ठेकेदारांनी बांधकाम सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना न केल्याने दुर्घटना घडल्याने पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक पांढरे तपास करत आहेत.

thieves stole cash and liquor bottles worth rs 40920 from liquor shop in kondhwa area
आंबा बर्फी, सुकामेव्यानंतर आता मद्याच्या बाटल्या लंपास – कोंढवा परिसरातील मद्यालयात चोरी
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
pune koyta attack
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खून, मार्केटयार्ड परिसरात चौघांकडून कोयत्याने वार; उपचारादरम्यान ससून रुग्णालयात मृत्यू
maharashtra govt announces key decisions ahead of elections 40000 crore for key projects in mumbai and thane
मुंबई, ठाणेकरांना टोलचा आणखी भुर्दंड; वित्त विभागाच्या आक्षेपानंतर ४० हजार कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी
Wardha dead bodies reservoir, Wardha,
वर्धा : जलाशयात आढळले तीन मृतदेह, दोघांची ओळख पटली; पूरबळी संख्या सात
Radhai building, illegal Radhai building, Dombivli,
डोंबिवलीतील बेकायदा राधाई इमारत भुईसपाट
nagpur ambazari lake overflowed flood situation completes one year
नागपूरच्या महापुराची वर्षपूर्ती! भय इथले संपत नाही…
Vasai, Crime Branch-2, dead body, Vasai crime news,
वसई : गुन्हे शाखा-२ च्या पथकाची जलद कामगिरी, महामार्गावर आढळलेल्या मृतदेहाच्या हत्ये प्रकरणात तृतीयपंथीय ताब्यात