सध्या नेत्यांचा भरोसा राहिलेला नाही

देशाला इंडिया म्हणायचं की भारत की हिंदू राष्ट्र यावरून सध्या देशात वाद सुरू आहे. हा महत्वाचा प्रश्न आहे का? असा प्रश्न ज्येष्ठ कामगार नेते बाबा आढाव यांनी उपस्थित केला आहे. ते पुण्याच्या दापोडीमध्ये भारतीय भटक्या विमुक्त प्रतिष्ठानच्या  कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. बाबा आढाव यांनी विविध प्रश्नांवर बोट ठेवत वास्तव मांडलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> जातनिहाय जनगणना झाली पाहिजे – शरद पवार

गोडसे यांचे कितीही नाव घेतलं तरी जगभरात गांधीजींचं नाव आहे. तुम्ही याला काय कराल असा प्रश्न देखील त्यांनी सत्ताधाऱ्यांना विचारला आहे. बाबा आढाव म्हणाले, देशाला इंडिया म्हणायचं की भारत म्हणायचं की हिंदु राष्ट्र यावरून वाद सुरू आहे. हे महत्त्वाचे प्रश्न आहेत का? तरुण आरक्षणाच्या पाठीमागे लागले आहेत. रोजगार मिळत नाही, महाराष्ट्रावर दुष्काळाचं सावट आहे. पुढे ते म्हणाले, सध्या राजकारणात भटक्या आणि विमुक्तांचा सुळसुळाट झाला आहे तुम्ही जातीवाले बाजूला झाले आहात. नेते कुठून कुठे जातील हे काही सांगता येत नाहीत. सकाळी कुठे असेल आणि संध्याकाळी कुठे असेल हे सांगता येत नाही. त्यांना सत्तेची भूक आहे. त्यांना मान पाहिजे. पुढे ते म्हणाले, आज तुम्ही कितीही गोडसेंच नाव घ्या. पण दुनिया गांधींचं नाव घेते आहे. याला तुम्ही काय करणार? स्वराज्याची लायकी काढणाऱ्या ‘त्या’ इंग्रज अधिकाऱ्यांच्या शेजारी आज लंडनमध्ये गांधीजींचा पुतळा आहे. कॅनडात काही नसताना उगाच देशातील वातावरण गरम केलं जात आहे. कशासाठी हे चाललं आहे. तर, आगामी निवडणुका जिंकण्यासाठी. असे ही आढाव म्हणाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Labour rights leader dr baba adhav target hindu extremists over various issue kjp 91 zws