लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पुणे : सत्ताधाऱ्यांमध्ये सौंदर्यदृष्टी असायला पाहिजे, तेव्हाच शहरे सुंदर दिसतात. आपल्याकडे सौंदर्यदृष्टीचा अभाव आहे, त्याकडे राज्यकर्त्यांचं लक्ष नाही, असे परखड भाष्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी केले. जागतिक आर्किटेक्ट दिनानिमित्त पुण्यात आयोजित कार्यक्रमात प्रसिद्ध रंगकर्मी-लेखक दीपक करंजीकर यांनी राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. त्यावेळी ठाकरे बोलत होते.

राज ठाकरे म्हणाले, शहर सुंदर दिसण्यासाठी मुळात सौंदर्यदृष्टी सत्तेत असायला पाहिजे, तरच ती खाली उतरते. नाहीतर तुम्ही खाली कितीही टाहो फोडा, त्याचा काहीही उपयोग नाही. महापालिकेत शहर विकास विभागात अभियंत्याला महत्त्व आहे. पण वास्तुविशारदाला नाही. आपल्याकडे सौंदर्यदृष्टीचा अभाव आहे, त्याकडे राज्यकर्त्यांचं लक्ष नाही. आपल्याकडं रस्ते बांधले जातात पण कोणत्या प्रकारचे रस्ते बांधायला हवेत, याचा विचार केला जात नाही. फक्त आहेत पैसे म्हणून रस्ते बांधले जातात.

आणखी वाचा-पुणे: गुन्हेगार मित्राला जामीन मिळवून देण्यासाठी त्याने केले साखळीचोरीचे गुन्हे

ठाकरे यांच्या हस्ते विकास भंडारी, विश्वास कुलकर्णी आणि शोभा भोपटकर या तिघा ज्येष्ठ वास्तुविशारदांचा ‘एस. के. बेलवलकर ॲवार्ड फॉर एक्सलन्स इन प्रोफेशन’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. इंडिअन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टसचे राष्ट्रीय अध्यक्ष विलास अवचट, सहसचिव संदीप बावडेकर, पुणे सेंटरचे अध्यक्ष विकास अचलकर, उपाध्यक्ष सीतेश अग्रवाल या वेळी उपस्थित होते.

…तर जगण्याला अर्थ आहे

मी एका चांगल्या शहरात जगतो आहे असे जर मला वाटले तर त्या जगण्याला अर्थ आहे. कारण तुम्ही रस्त्याने जात असताना खड्ड्यात पाय पडतो, पाय मुरगळतोय, पदपथ नीट मिळत नाहीत. याला जगणं म्हणत नाही. तुमचा जन्म झालाय म्हणून जगता, अशी टिप्पणी राज ठाकरे यांनी केली. अनेक तरुण-तरुणी म्हणतात की आम्हाला परदेशात जायचंय, पण का जायचंय? शिक्षण तर त्यांना इथेही मिळतंय पण सभोवतालचे वातावरण त्यांना मिळत नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

आणखी वाचा-अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलच्या कारखान्याची जबाबदारी सांभाळणारा अटकेत

एका पुण्यामध्ये पाच पुणे

गेली २५ वर्षे मी पुण्यात येतो आहे. पुण्यामध्ये ही गोष्ट मी अनेकदा माझ्या भाषणातून सांगितली आहे. मुंबई बरबाद व्हायला एक काळ गेला. पुणे बरबाद व्हायला वेळ लागणार नाही. आज पुणे कुठे राहिलं आहे? असा सवाल राज ठाकरे यांनी केला. एका पुण्यामध्ये आज पाच-पाच पुणे आहेत. हिंजवडीचे पुणे वेगळे, नदीकाठचे वेगळे, विमाननगरचे वेगळे असे पुणे झाले आहे. पुणे म्हणून कुठे राहिले आहे? याला कारण राज्यकर्त्यांचं दुर्लक्ष. शहर विकासाचे नियोजन व्यवस्थित करावे हे त्यांना कळले पाहिजे. राजकारण्यांना धडा शिकवायचा असेल तर त्यांना मतपेटीमधून उत्तर दिले गेले पाहिजे. तेव्हाच त्यांना त्यांची चूक उमगेल. मात्र, आश्चर्य म्हणजे असे काहीच होत नाही, असेही राज ठाकरे यांनी सांगितले.