अधिकारी, लोकप्रतिनिधी, ठेकेदारांची संगनमताने लूट
पिंपरी महापालिकेचे पर्यावरणविषयक बाबींकडे अक्षम्य दुर्लक्ष्य झाल्याचे वेळोवेळी उघड झाले आहे. पर्यावरण रक्षण आणि संवर्धनाच्या नावाखाली कोटय़वधी रुपये खर्च केले जातात, मात्र त्यामध्ये टक्केवारीची दुकाने अधिक असल्याचे दिसून येते. शहरातील नद्यांची गटारे झाली असून, पालिकेकडूनच नदीपात्रात प्रक्रिया न करता सांडपाणी सोडले जाते. वारंवार भराव टाकण्याच्या उद्योगामुळे नद्यांची लांबी-रुंदी कमी झाली आहे. शहरात दरवर्षी होणारी वृक्षलागवड म्हणजे ‘पुढचे पाठ, मागचे सपाट’ असा प्रकार होऊन बसला आहे.
पर्यावरणविषयक जागृती अशा गोंडस शब्दांचा वापर करत पालिकेने अनेक ठिकाणी ‘बाजार’च मांडल्याचे उघड गुपित आहे. पालिका अधिकारी, प्रस्थापित लोकप्रतिनिधी आणि पोसलेले ठराविक ठेकेदार यांच्या युतीने पालिकेची संगनमताने लूट चालवली आहे. नियोजनशून्य कारभार आणि खाबूगिरीमुळे पर्यावरण जागृती कागदावरच राहिली आहे. शहरातील वायुप्रदूषण, जलप्रदूषण, ध्वनिप्रदूषण अशा सर्वच बाबतीत पालिकेची उदासीनता आहे. शहरातून वाहणाऱ्या इंद्रायणी, पवना नदीची पात्रे अक्षरश: गटारे झाली आहेत. प्रक्रिया न करता सांडपाणी नदीत सोडण्याच्या कामात महापालिकाच आघाडीवर आहे. शहरातील अनेक कारखाने रात्रीच्या अंधारात नद्यांमध्ये सांडपाणी सोडतात, त्यावर कोणाचेच नियंत्रण नाही. अशा कंपनी चालकांवर कारवाई झाल्याचे ऐकिवात नाही. नदीपात्रात दिवसाढवळय़ा भराव टाकले जातात. नदी बुजवण्यामागे शिस्तबद्ध उद्योग सुरू आहे. याविषयी ओरड झालीच तर कारवाईचा देखावा केला जातो. पुन्हा ‘जैसे थे’ कारभार सुरू राहतो. ओढय़ांमध्ये घाणीचे साम्राज्य दिसून येते. शहरात जवळपास २०० नाले आहेत. बहुतांश नाले तुंबलेले असतात. ‘कागदी घोडे’ नाचवले जात असल्याने नालेसफाई कागदावरच राहते, त्यातून लाखो रुपये लाटले जातात. नद्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात जलपर्णी साचली तरी त्याकडे पालिकेचे दुर्लक्ष होते. सामाजिक कार्यकर्ते, संस्था, संघटना पुढाकार घेऊन जलपर्णी काढण्याचे काम स्वयंस्फूर्तीने करतात, मात्र पालिका प्रशासन ढिम्म असते. पर्यावरणाची कामे करण्यासाठी अधिकाऱ्यांनी तसेच लोकप्रतिनिधींनी पोसलेले ठेकेदार आहेत. त्यांचे पर्यावरण संवर्धनाच्या नावाखाली दलालीचे उद्योग चालतात. पावसाळा सुरू झाला, की वृक्षलागवडीचा धडाका लावला जातो. त्या लावलेल्या झाडांचे पुढे काय होते, याकडे कोणाचेच लक्ष नसते. पर्यावरणदिन आला, की त्या दिवशी काहीतरी उपक्रम राबवले जातात, पुन्हा ‘जैसे थे’ कारभार सुरू राहतो, हे अनेक वर्षांपासून सुरू आहे.