पिंपरी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात रोज ४०० वाहनांची रांग; नूतनीकरण फक्त ३० वाहनांचे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पिंपरी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात नियोजनाच्या अभावामुळे वाहन नोंदणीच्या नूतनीकरणासाठी आलेल्या वाहनधारकांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. नोंदणीचे नूतनीकरण करण्यासाठी पहाटेपासूनच वाहनांच्या रांगा लागत आहेत. चारशे ते पाचशे वाहनांच्या रांगा लागत असताना रोज केवळ तीस वाहनांचे नूतनीकरण होत असल्याने वाहनधारकांना आर्थिक भरुदडही सहन करावा लागत आहे.

पिंपरी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत खेड, मावळ, लोणावळा, जुन्नर, आंबेगाव आदी ग्रामीण भागांचा समावेश आहे. त्यामुळे या भागातील वाहनधारकांना आरटीओतील कामकाजासाठी पिंपरीला यावे लागते. वाहन नोंदणी नूतनीकरण करण्यासाठी ग्रामीण भागात ट्रॅक नसल्यामुळे परिवहन कार्यालयाकडून होणारे वाहनांचे नूतनीकरण बंद करण्यात आले होते. मात्र, ग्रामीण भागात हा ट्रॅक उपलब्ध नसल्यामुळे दर महिन्याला घेण्यात येणाऱ्या शिबिरामध्ये तेथे सुरू करण्यात आलेले वाहन नोंदणी नूतनीकरण बंद करण्यात आले आहे. शिवाय सरकारने वाहनाला वेग नियंत्रक बसविण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंतच मुदतवाढ दिल्यामुळे वाहन नोंदणी नूतनीकरण करण्यासाठी पिंपरी येथे वाहनधारकांची अचानक गर्दी होत आहे.

मोशी येथील नवीन आरटीओ कार्यालयाच्या शेजारी वाहन नोंदणी नूतनीकरण करण्यात येत आहे. त्या ठिकाणी जड वाहने, तीन चाकी वाहने आणि चारचाकी वाहनांचे परवाना नूतनीकरण करण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. चालू आठवडय़ात मंगळवारी आणि बुधवारी वाहनांची रांग जाधववाडी येथील सीएनजी पंपापासून दोन किलोमीटपर्यंत लांब गेली होती.

एका वाहन मोटर निरीक्षकाला ३० ते ४० वाहनांच्या परवान्याचे नूतनीकरण करण्याची मर्यादा घालण्यात आली आहे. त्या निरीक्षकाने मर्यादेपेक्षा जास्त वाहनांचे नूतनीकरण केले तर त्यांना वरिष्ठांकडून कारणे दाखवा नोटीस दिली जाते. त्यामुळे वाहन निरीक्षक दिलेल्या मर्यादेतच वाहन नोंदणी नूतनीकरण करून वाहनधारकांना दुसरे साहेब येणार आहेत असे सांगून काम बंद केले जाते. मात्र, त्या ठिकाणी दुसरे वाहन निरीक्षकच येत नसल्याने उपशीपोटी चालकांना तिष्ठत बसावे लागत आहे, अशा प्रतिक्रिया वाहनचालकांनी दिल्या. वाहन नोंदणी नूतनीकरणासाठी आलेल्या वाहनांचे नूतनीकरण करण्यासाठी दोन-दोन दिवस लागतात. त्यामुळे ग्रामीण भागातील काही वाहनधारक मुक्काम करतात किंवा परत घरी जातात. त्यामुळे नूतनीकरणाच्या काळात व्यवसाय बंद राहात असल्यामुळे त्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. दुसरीकडे हेलपाटय़ामुळे होणाऱ्या इंधन खर्चाचा वाहनधारकांना मोठ भरुदड सहन करावा लागत आहे. नूतनीकरणाचे ठिकाण निर्जन असून तेथे पाण्याचीही सोय नाही.

‘स्पिड गव्हर्नर’ बसविण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे वाहन नोंदणी नूतनीकरण करण्यासाठी अचानक गर्दी वाढली आहे. आरटीओ कार्यालयाकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नाही. त्यामुळे थोडी गैरसोय होत आहे. ही गैरसोय दूर करण्यासाठी सुट्टीच्या काळातही वाहन नोंदणी नूतनीकरण करण्यात येणार आहे.  -अजित शिंदे , उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी