बृहन् महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयामध्ये (बीएमसीसी) विद्यार्थिनींसाठी वसतिगृह उभारण्यात येत असून या वसतिगृहाचे भूमिपूजन गुरुवारी करण्यात आले. पुढील वर्षीपासून हे वसतिगृह उपलब्ध होणार आहे.
विद्यार्थिनींच्या निवासाची सुविधा बीएमसीसीमध्ये उपलब्ध होणार असून १६० विद्यार्थिनी राहू शकतील अशा क्षमतेचे वसतिगृह महाविद्यालयाच्या आवारात उभारण्यात येणार आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. अजित पटवर्धन यांच्या हस्ते या वसतिगृहाचे भूमिपूजन करण्यात आले. या वेळी उपाध्यक्ष विकास काकतकर, कार्यवाह डॉ. श्रीकृष्ण कानेटकर, संचालक राम निंबाळकर, माजी आमदार बाबूराव पाचर्णे, प्राचार्य डॉ. चंद्रकांत रावळ, उपप्राचार्य डॉ. जगदीश लांजेकर उपस्थित होते.
या वसतिगृहासाठी पाच कोटी रुपये खर्च येणे अपेक्षित असून ३२ हजार फुटांचे बांधकाम करण्यात येणार आहे. अभ्यासिका, भोजनालय, कॉमनरूम, वैद्यकीय सुविधा या वसतिगृहामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. एका वर्षांत या वसतिगृहाचे बांधकाम पूर्ण होणे अपेक्षित असून पुढील वर्षांपासून हे वसतिगृह उपलब्ध होऊ शकेल, असे डॉ. रावळ यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा