अस्वच्छता, पाणी-विजेचाही पुरवठा नाही

गर्दीच्या ठिकाणी, रस्त्याच्या दुतर्फा, बस-रेल्वे स्थानकांवर, सरकारी तसेच महापालिका कार्यालये यांसारख्या सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी सुरक्षित आणि स्वच्छतागृह असणे हा महिलांचा मूलभूत अधिकार आहे. परंतु, महापालिकेकडून त्याला हरताळ फासला गेला असून नोकरी आणि कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या महिलांना स्वच्छतागृहांचा वापरच करता येत नाही अशी परिस्थिती आहे. महिलांच्या स्वच्छतागृहांची अवस्था दयनीय झाली आहे. पाणी-विजेची व्यवस्था नाही, स्वच्छतागृहांबाहेर महिलांसाठी असा फलक नाही, पर्स किंवा ओढणी अडकवण्यासाठी हुक नाही, काहींचे दरवाजेच खिळखिळे, असे चित्र घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या ११७ महिला स्वच्छतागृहांच्या पाहणीत दिसून आले आहे.

Chief Minister of Telangana, Himachal and Deputy Chief Minister of Karnataka reply to BJP on the scheme Print politics
गरिबांचे पैसे गरिबांना ही काँग्रेसची हमी; तेलंगणा, हिमाचलचे मुख्यमंत्री तर कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचे भाजपला प्रत्युत्तर
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Advice from Uttar Pradesh State Commission for Women to male tailors
‘पुरुष शिंप्यांनी महिलांचे माप घेऊ नये’ ; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाचा सल्ला
Violence against women increase, conviction rate
महिला अत्याचार वाढले….पण, गुन्ह्यातील दोषसिद्धीचे प्रमाण मात्र……
elderly woman rescued by fire brigade after being trapped in flat
सदनिकेत अडकलेल्या ज्येष्ठ महिलेची सुटका- बेशुद्धावस्थेतील महिलेवर त्वरीत उपचार केल्याने अनर्थ टळला
Five young women sold into prostitution with the lure of employment
नोकरीच्या आमिषाने कुंटणखान्यात पाच तरुणींची विक्री, गुन्हे शाखेकडून तरुणींची सुटका
Pimpri, Female computer operator bribe, computer operator bribe Female, bribe,
पिंपरी : सहाशे रुपयांची लाच घेताना संगणक चालक महिला अटकेत
Hardworking old women Viral Video
‘गरिबी माणसाला जगणं शिकवते…’ भरपावसात आजींनी असं काही केलं; VIDEO पाहून नेटकरीही झाले भावूक

अभिव्यक्ती संघटनेच्या वतीने ‘राईट टू पी’ ही मोहीम राबवली जात असून त्याअंतर्गत स्वच्छतागृहांची पाहणी करण्यात आली. महापालिकेच्या अंदाजपत्रकात महिलांच्या स्वच्छतागृहांसाठी पुरेशी तरतूद नाही, काही स्वच्छतागृहे मुख्य रस्त्यांपासून आतमध्ये असून त्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे महिलांना मोफत, स्वच्छ, सार्वजनिक स्वच्छतागृह उपलब्ध व्हावे, स्वच्छतागृह बांधताना विकलांग महिलांचा विचार व्हावा, महिला स्वच्छतागृहांचे व्यवस्थापन महिलांनीच करावे, प्रत्येक दोन किलोमीटरच्या अंतरावर स्वच्छतागृहांची सोय असावी, अशा विविध मागण्या संघटनेच्यावतीने करण्यात आल्या आहेत.

संगमवाडी, शिवाजीनगर, वाकडेवाडी, रेल्वे स्थानक परिसर, रेंजहिल्स रस्ता, मॉडेल कॉलनी, आकाशवाणी चौक, महापालिका भवन, बालगंधर्व रंगमंदिर परिसर, गाडगीळ पूल, डेक्कन जिमखाना, पुलाची वाडी, शिरोळे रस्ता, फग्र्युसन रस्ता, बीएमसीसी रस्ता, प्रभात रस्ता इत्यादी ठिकाणी संघनेतर्फे पाहणी करण्यात आली आहे.

भाजपला विसर

भारतीय जनता पक्षाने महापालिका निवडणुकीच्या जाहीरनाम्यात प्रत्येक प्रभागात स्वच्छतागृहांची उभारणी, दिवसातून दोन वेळा त्यांच्या स्वच्छतेचे नियोजन, बाजारपेठा आणि गर्दीच्या ठिकाणी फिरती स्वच्छतागृहे, स्वच्छतागृहांच्या सुरक्षिततेच्या उपाययोजना, स्वच्छतागृहांची देखभाल, शुल्कसंकलन आणि स्वच्छता यासाठी प्राधान्याने सेविकांची नेमणूक करणे, अशी आश्वासने दिली होती. मात्र, भारतीय जनता पक्ष सत्तेत येऊन तीन महिने उलटूनही अद्याप सार्वजनिक महिला स्वच्छतागृहांबाबत कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही.

स्वच्छतागृहांचा लेखाजोखा

  • एकूण स्वच्छतागृहे- ११३
  • महिलांसाठी असे नामफलक असलेली स्वच्छतागृहे- १६
  • पाण्याची उपलब्धता- २७ ठिकाणी
  • कचरा पेटी- १२ ठिकाणी
  • पर्स अडकवण्यासाठी हुक- कुठेही नाही
  • विजेची उपलब्धता- ४५ ठिकाणी
  • हात धुण्याचे भांडे (बेसीन)- १५ ठिकाणी