राज्यात महायुतीचे सरकार आल्यावर लाडक्या बहीण योजनेतील लाभार्थी महिलांचे पहिला हप्ता केव्हा मिळणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. तर या योजनेसाठी लागणार्या निधीवरून विरोधक सत्ताधारी पक्षावर आरोप करीत आहेत. या सर्व राजकीय आरोप प्रत्यारोप दरम्यान राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे या पुणे दौर्यावर आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत अनेक घडामोडींबाबत भाष्य केले.
हेही वाचा – मुलीशी अश्लील कृत्य प्रकरणी शिकवणी चालकाविरुद्ध गुन्हा
हेही वाचा – पुणे : वेदनाशामक औषधांचा नशेसाठी वापर, तरुणी अटकेत; औषधांच्या १६० बाटल्या जप्त
लाडक्या बहीण योजनेचा पहिला हप्ता लाभार्थी महिलांना केव्हा दिला जाणार आहे याबाबत महिलांकडून विचारणा होत आहे. तर दुसर्या बाजूला या योजनेमुळे शिक्षकांचा पगार होण्यास उशीर होणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्या प्रश्नावर आदिती तटकरे म्हणाल्या की, तुम्हाला चुकीची माहिती मिळाली असून महिला बालविकास विभागाला इतर कोणत्याही खात्याचा निधी वळविण्यात आलेला नाही. नागपूर येथे झालेल्या अधिवेशनादरम्यान सव्वाशेकोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. तसेच आचारसंहितेच्या कालावधीत निधीला स्थगिती देण्यात आली होती. त्या निधीतून हप्ता दिला जात आहे. त्यामुळे इतर कोणत्याही विभागाच्या निधीशी संबध नाही. तसेच लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना पहिला हप्ता हा २४ डिसेंबरपासून देण्यास सुरुवात केली असून पुढील तीन ते चार दिवसांत सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यात पहिला हप्ता पोहोच होईल, अशी भूमिका मांडत विरोधकांना त्यांनी सुनावले.