अटक टाळण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरून कात्रज पोलीस चौकीच्या सहायक पोलीस निरीक्षक द्वारका विश्वनाथ डोखे आणि पोलीस नाईक विश्वनाथ नामदेव शिंदे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. त्यांच्यावर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत बसवराज शिवलिंग बनसोडे (वय ३२, रा. प्रेमनगर वसाहत, मार्केट यार्ड) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिदलेल्या माहितीनुसार, बनसोडे हे अॅड. पवार यांच्याकडे सहायक म्हणून काम करतात. अॅड. पवार यांनी खोटे प्रतिज्ञापत्र बनविले म्हणून त्याच्याविरुद्ध कात्रज पोलीस चौकीत गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती. या गुन्ह्य़ाचा तपास डोखे या करत होत्या. गुन्ह्य़ाचा तपास सुरू असताना डोखे यांनी बनसोडे यांना तुलाही अटक करावी लागेल. अटक टाळायची असेल, तर पाच हजार रुपये लाचेची फोनवरून मागणी केली. ती रक्कम पोलीस कर्मचारी शिंदे यांच्याकडे देण्यास सांगितले.
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १० एप्रिल रोजी सापळा आयोजन केले होते. पण त्यांनी लाचचे रक्कम त्या वेळी स्वीकारली नाही. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या चौकशीत डोखे यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांनी जामिनावर मुक्तता करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lady assistant police inspector arrested in bribe case
Show comments