दिवाळी खरेदीसाठी गर्दी झाल्याने मध्यभागात शनिवारी वाहतूक कोंडी झाली. मध्यभागातील लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्ता, टिळक रस्ता परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली होती.दिवाळीचा प्रारंभ २१ ऑक्टोबरपासून होत आहे. २१ ऑक्टोबर रोजी वसूबारस आहे. खरेदीसाठी दहा दिवसांचा अवधी असल्याने शनिवारी (८ ऑक्टोबर) संख्येने नागरिक मध्यभागातील मंडई, लक्ष्मी रस्ता परिसरात आले होते. शनिवार आणि रविवारी सुट्टी असल्याने शहर तसेच उपनगरातील नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. अनेकजण मोटारीतून खरेदीसाठी मध्यभागात आले होते. मोठ्या संख्येने मोटारी रस्त्यावर आल्याने मध्यभागातील वाहतूक विस्कळीत झाली होती. शनिपार, मंडई, तुळशीबाग, रविवार पेठेतील कापडगंज परिसरातून चालणे देखील अवघड झाले होते. गर्दीतून वाट काढत नागरिकांनी खरेदी केली. डेक्कन जिमखाना, फर्ग्युसन रस्ता, गणेशखिंड रस्ता, कर्वे रस्ता , शास्त्री रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

हेही वाचा >>>कारागृहातून आठ दिवसांपूर्वीच आला बाहेर आणि पुन्हा ‘आत’ गेला !

Cyber ​​criminals cheated the people of Nagpur of Rs 141 crore
सायबर गुन्हेगारांनी नागपूरकरांना घातला १४१ कोटींचा गंडा, १३ हजारांवर तक्रारी
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Changes in gold prices What are today gold rates
सोन्याच्या दरात मोठे बदल… हे आहेत आजचे दर…
Prices will increase due to reduced arrival of chillies Nandurbar news
यंदा लाल तिखटाचा भडका उडणार; मिरचीची आवक घटल्याने दर वाढणार
got elected four times through evms supriya sule on evm tampering allegations by congress
चार वेळा निवडून आले ईव्हीएमवर संशय कसा घेऊ? खासदार सुप्रिया सुळे यांचे विधान
red sanders smuggling
Pushpa Box Office Collection : चंदन तस्करीवर बेतलेल्या ‘पुष्पा’नं कमवले १५०० कोटी; पण खऱ्याखुऱ्या रक्तचंदनाला मात्र ग्राहकच नाही
bullock cart race
मुरुड समुद्रकिनारी बैलगाडा शर्यतीच्या सरावाचा थरार, पर्यटकांचा मात्र थरकाप
Manghar Transformation into India First Honey Village in crisis
महाबळेश्वरमधील ‘मांघर’च्या मधमाश्यांवर संकट

खरेदीसाठी गर्दी वाढल्याने वाहतूक पोलिसांनी बाजीराव रस्त्यावरील अप्पा बळवंत चौक ते बुधवार पेठेतील हुतात्मा चौकापर्यंतची एकेरी वाहतूक बंद केली होती. मंडईतील मिसाळ वाहनतळ तसेच हुतात्मा बाबू गेून चौकातील वाहनतळावर मोटारीं लावण्यासाठी रांगा लागल्या होत्या. दुपारनंतर वाहनतळावर मोटारी लावण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने वाहनतळ बंद करण्यात आला. मोटार चालकांनी मध्यभागातील गल्ली बोळात बेशिस्तपणे मोटारी लावल्याने वाहतूक कोंडीत भर पडली. दिवाळी खरेदीसाठी मोठी गर्दी झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली. वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी मध्यभागातील प्रमुख रस्त्यांवर तसेच मंडई परिसरात वाहतूक पोलिसांकडून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली. मध्यभागासह कोथरुड, कर्वेनगर, वारजे, सिंहगड रस्ता, धनकवडी, कात्रज, हडपसर, येरवडा भागातील बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी झाली होती.

Story img Loader