दिवाळी खरेदीसाठी गर्दी झाल्याने मध्यभागात शनिवारी वाहतूक कोंडी झाली. मध्यभागातील लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्ता, टिळक रस्ता परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली होती.दिवाळीचा प्रारंभ २१ ऑक्टोबरपासून होत आहे. २१ ऑक्टोबर रोजी वसूबारस आहे. खरेदीसाठी दहा दिवसांचा अवधी असल्याने शनिवारी (८ ऑक्टोबर) संख्येने नागरिक मध्यभागातील मंडई, लक्ष्मी रस्ता परिसरात आले होते. शनिवार आणि रविवारी सुट्टी असल्याने शहर तसेच उपनगरातील नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. अनेकजण मोटारीतून खरेदीसाठी मध्यभागात आले होते. मोठ्या संख्येने मोटारी रस्त्यावर आल्याने मध्यभागातील वाहतूक विस्कळीत झाली होती. शनिपार, मंडई, तुळशीबाग, रविवार पेठेतील कापडगंज परिसरातून चालणे देखील अवघड झाले होते. गर्दीतून वाट काढत नागरिकांनी खरेदी केली. डेक्कन जिमखाना, फर्ग्युसन रस्ता, गणेशखिंड रस्ता, कर्वे रस्ता , शास्त्री रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा