सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्र गुरुकुलच्या वतीने शनिवारी (५ नोव्हेंबर) त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त ‘ललित पौर्णिमा’ महोत्सव साजरा केला जाणार आहे. महोत्सवात ललित कला केंद्राच्या माजी विद्यार्थ्यांच्या गायन, वादन, नर्तन आणि नाट्यप्रयोगांचे सादरीकरण होणार आहे.
ललित कला केंद्र परिसरातील अंगणमंच येथे रात्री नऊ वाजल्यापासून सुरू होणाऱ्या ललित पौर्णिमा महोत्सवात मराठी रंगभूमी दिन साजरा केला जाणार आहे. महोत्सवात आद्य मराठी नाटक ‘सीता स्वंयवर’मधील पदांचे गायन, शास्त्रीय गायन, स्वर-ताल वाद्यमेळ, ‘मी वस्त्रवती’ ही नृत्यरचना, लावणी नृत्य, ‘अकादमी समोर अहवाल’ आणि ‘आळशी अत्तरवाल्याची गोष्ट’ ही एकल नाट्ये, ‘हात्तमालाच्या पल्याड’ आणि ‘संगीत कमली की सत्त्वपरीक्षा अर्थात ह्यो रिश्ता क्या केहलाता है’ या नाट्यप्रयोगांचे सादरीकरण होणार आहे, अशी माहिती ललित कला केंद्राचे विभागप्रमुख डाॅ. प्रवीण भोळे यांनी दिली.
पुणे: ललित कला केंद्राची शनिवारी ‘ललित पौर्णिमा’; त्रिपुरारीनिमित्त रात्रभर कला सादरीकरण
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्र गुरुकुलच्या वतीने शनिवारी (५ नोव्हेंबर) त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त ‘ललित पौर्णिमा’ महोत्सव साजरा केला जाणार आहे.
Written by अक्षय येझरकर
First published on: 03-11-2022 at 15:52 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lalit kala kendra lalit poornima on saturday pune print news amy