सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्र गुरुकुलच्या वतीने शनिवारी (५ नोव्हेंबर) त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त ‘ललित पौर्णिमा’ महोत्सव साजरा केला जाणार आहे. महोत्सवात ललित कला केंद्राच्या माजी विद्यार्थ्यांच्या गायन, वादन, नर्तन आणि नाट्यप्रयोगांचे सादरीकरण होणार आहे.
ललित कला केंद्र परिसरातील अंगणमंच येथे रात्री नऊ वाजल्यापासून सुरू होणाऱ्या ललित पौर्णिमा महोत्सवात मराठी रंगभूमी दिन साजरा केला जाणार आहे. महोत्सवात आद्य मराठी नाटक ‘सीता स्वंयवर’मधील पदांचे गायन, शास्त्रीय गायन, स्वर-ताल वाद्यमेळ, ‘मी वस्त्रवती’ ही नृत्यरचना, लावणी नृत्य, ‘अकादमी समोर अहवाल’ आणि ‘आळशी अत्तरवाल्याची गोष्ट’ ही एकल नाट्ये, ‘हात्तमालाच्या पल्याड’ आणि ‘संगीत कमली की सत्त्वपरीक्षा अर्थात ह्यो रिश्ता क्या केहलाता है’ या नाट्यप्रयोगांचे सादरीकरण होणार आहे, अशी माहिती ललित कला केंद्राचे विभागप्रमुख डाॅ. प्रवीण भोळे यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा